शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

साडेसात हजार शेतकरी वीज जोडणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:45 PM

गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़

ठळक मुद्देवर्षभर यादी प्रलंबित : शेतकऱ्यांना आधाराची गरज

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़विदर्भात सर्वाधिक कमी पावसाची नोंद गतवर्षी अमरावती जिल्ह्यात झाली़ शेतकºयांनी अल्प पावसात आपल्या शेतातून खरिपाचे उत्पन्न घेतले. मात्र रबी हंगामात विहिरीला काहीअंशी पाणी असताना कृषिपंपाची वीज नसल्याने कोणतेही उत्पन्न घेता येत नाही़ यंदा जिल्ह्यात विंधन, सिंचन विहिरीचे खोदकाम करण्यात आले. मात्र वीज जोडण्या मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.एचव्हीडीएस लाभ मिळणार कधी?पैसे भरून प्रलंबित कृषिपंप ग्राहकांना आता उच्च वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती़ सध्याच्या पध्दतीनुसार शेतकºयांना ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून १५ ते २० कृषिग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो़ त्यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीजहानी होते़ वीज पुरवठ्यात नेहमी तांत्रिक बिघाड होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ किमान दोन ते तीन शेतकºयांना एक रोहीत्र देण्यात येऊन एचव्हीडीएस या नव्या प्रणालीद्वारे कधी वीज देण्यात येणार, असा सवाल शेतकºयांनी केला आहे़१३ तालुके उपेक्षितगत एक वर्षापासून सर्वाधिक अचलपूर तालुक्यातील ९५५ शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहे़नांदगाव खंडेश्वर ९४२, धामणगाव रेल्वे ७८०, दर्यापूर ७५०, अंजनगाव सुर्जी ७१४, मोर्शी ५९७, चांदूर रेल्वे ४५९, अमरावती ५५२, भातकुली २८८, तिवसा ४६४, चांदूर बाजार ५३५, वरूड ४३५, धारणी १०५, चिखलदरा ६५ या तालुक्यातील शेतकºयांची संख्या दररोज विज मंडळाच्या कार्यालयात वीज जोडणीसाठी चकरा मारत आहे़शासनाच्या सिंचन विहीर योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी विहीर खोदली. मात्र, कृषिपंपाना वीजपुरवठा मिळत नसल्याने कोणताच लाभ होत नाही़ शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे़- अशोक क्षीरसागर, शेतकरी, जळगाव