आठवडाभर प्रक्रिया : १,१५,७०३ क्विंटल खरेदी बाकीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ११ केंद्रांवर अद्याप एक लाख १५ हजार ७०३ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. ७ हजार २९८ शेतकऱ्यांची ही तूर आहे. यापैकी अमरावती, अचलपूर, दर्यापूर येथील केंद्रावर अद्यापही मोठ्या प्रमाणात तूर पडून आहे. मात्र, राज्य शासनाच्या यंत्रणांद्वारा झपाट्याने खरेदी व मोजणी होत असल्याने याआठवड्यात ही प्रक्रिया पूर्णत्वास जाणार आहे.यासर्व केंद्रांवर अधिक चाळण्या, वजन-काटे लावण्यात आले आहेत. तसेच खरेदीसाठी चार विभागाचे पथक असल्याने खरेदीचा वेग वाढला आहे. मंगळवार उशिरापर्यंत १५ हजार ३१७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. राज्य शासनाने २२ एप्रिलनंतर आतापर्यंत ७ हजार ४९० शेतकऱ्यांची एक लाख ५६ हजार ४६६ क्विंटल तूर खरेदी केली. यामध्ये चांदूररेल्वे केंद्रावर १५८ शेतकऱ्यांची २३३१.८१ क्विंटल, नांदगाव केंद्रावर ५०८ शेतकऱ्यांची ९६४१.१० क्विंटल, मोर्शी केंद्रावर ४८० शेतकऱ्यांची ८९५८.४१ क्विंटल, अमरावती केंद्रावर ८७१ शेतकऱ्यांची २६५८२.४२ क्विंटल, धामणगाव केंद्रावर ६२१ शेतकऱ्यांची १०११६, अचलपूर केंद्रावर १२५४ शेतकऱ्यांची २५८२५.५०, अंजनगाव केंद्रावर ९७७ शेतकऱ्यांची १७७३५.५५, चांदूरबाजार केंद्रावर ७५५ शेतकऱ्यांची १६२११.२२, दर्यापूर केंद्रावर १०३७ शेतकऱ्यांची २५३१६.०१, वरूड केंद्रावर ७५७ शेतकऱ्यांची १२९३२ व धारणी येथे ७२ शेतकऱ्यांची ८१५.५४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. चार केंद्रांवर शासनाद्वारे सुरू तूर खरेदी संपत असल्याने याठिकाणी आता नाफेडद्वारा तूर खरेदी करण्यात येणार आहे. अचलपूर, दर्यापूर केंद्रात सर्वाधिक ढीगसद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ११२५ शेतकऱ्यांची २१,५०० क्विंटल, दर्यापूर केंद्रावर २५८४ शेतकऱ्यांची २४,३७९ क्विंटल, अमरावती केंद्रावर १७४९ शेतकऱ्यांची १९४१८ क्विंटल, वरूड केंद्रावर २२५ शेतकऱ्यांची २०,१५९ क्विंटल तूर पडून आहे. याआठवड्यात ही तूर खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. चांदूरबाजारला नाफेडची खरेदी सुरूशासनाद्वारा खरेदी करण्यात आलेली तूर संपल्याने नाफेडद्वारा ३१ मेपर्यंत तूर खरेदी केली जाईल. चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव आदी ठिकाणी एक-दोन दिवसांत नाफेडची खरेदी सुरू होईल. जिल्ह्यातील उर्वरित केंद्रांवर देखील तूर खरेदी होणार आहे.
सात हजार शेतकऱ्यांची तूर बाजार यार्डातच !
By admin | Published: May 11, 2017 12:05 AM