शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

चिखलदऱ्यात पाच वर्षात पाऊणशे पर्यटकांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 4:33 PM

विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा येथे अलीकडच्या काळात विविध पॉइंटवर आत्महत्या आणि अपघातात पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच वर्षांत ५० पर्यटकांनी आत्महत्या केल्या, तर जवळपास ७५ अपघाती मृत्यू झाले.

ठळक मुद्देआत्महत्येची पन्नाशी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सुरक्षेचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनरेंद्र जावरेअमरावती : विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा येथे अलीकडच्या काळात विविध पॉइंटवर आत्महत्या आणि अपघातात पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच वर्षांत ५० पर्यटकांनी आत्महत्या केल्या, तर जवळपास ७५ अपघाती मृत्यू झाले. एकट्या भीमकुंड पॉइंटवरून २० जणांनी उडी घेऊन जीवन संपविले. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला सुरक्षा रक्षकांना तैनात करण्याचे आणि सूचनाफलक लावण्याचे आदेश दिले.समुद्र सपाटीपासून ३६०० फूट उंचावर असलेले चिखलदरा पर्यटनस्थळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या पर्यटनस्थळाला मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. आॅगस्ट ते फेब्रुवारी या काळात चिखलदरा पर्यटनस्थळ हिरवेगार असल्याने या काळात पर्यटकांची संख्या सर्वाधिक राहते. गगनचुंबी उंच पहाडावर धो-धो कोसळणाºया धबधब्यांचा मनमोहन नजारा, आल्हाददायक वातावरण येणाऱ्या पर्यटकांना मोहित करणारे ठरते. परिवार आणि मित्रमंडळासोबत आलेले पर्यटक संपूर्ण चिखलदरा पालथा घालतात. दुसरीकडे कौटुंबिक वाद किंवा इतर समस्यांनी ग्रासलेल्यांनी येथील उंच कड्यांवरून स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बरेचदा उघडकीस आला आहे. काहींनी जंगलात झाडांना गळफास घेऊन तसेच विष प्राशूनसुद्धा आत्महत्या केली. भीमकुंड दरी आणि डोह, सक्कर तलाव, पंचबोल पॉइंट, गाविलगड किल्ल्यातील मच्छी तलाव, पारस तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.

सर्व पॉइंट व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीतपूर्वी चिखलदरा नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेले सर्व पॉइंट नंतर वनविभाग व आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत आले आहेत. पूर्वीपासूनच या पॉइंटवर दरीच्या काठावर लोखंडी सुरक्षा कठडे आहेत. तथापि, धोकादायक असलेल्या या पॉइंटवर फलक बेपत्ता आहेत, सुरक्षा गार्ड नाहीत. पावसाळा सुरू होताच भीमकुंड, पंचबोल, देवी पॉइंट, गाविलगड, गोराघाट पॉइंट, जत्राडोह येथे पर्यटक गर्दी करीत आहेत. यामुळे तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चिखलदरा नगरपालिकेला एका पत्राद्वारे दिले.कुठे गेली वनव्यवस्थापन समिती?धोकादायक पॉइंटवर वनविभागाच्यावतीने एक वनरक्षक, एक सुरक्षा रक्षक शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी तैनात करण्यात येत होते. मात्र, तेही दिसेनासे झाले आहेत. व्याघ्र प्रकल्प अंतर्गत असलेल्या या पॉइंटची संपूर्ण जबाबदारी ग्राम विकास समिती व संयुक्त वनव्यवस्थापन समितीवर आहे. त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा दिला जातो. तथापि, त्या निधीतही वनकर्मचाऱ्यांनी अध्यक्षांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात घोळ केला. परिणामी समितीचे सदस्य येत नसल्याची माहिती आहेभीमकुंड, पंचबोलवर सर्वाधिक आत्महत्याभीमाने कीचकाचा वध केल्यानंतर रक्ताने माखलेले हात ज्या कुंडात धुतले, त्या कुंडाला भीमकुंड असे नाव आहे. एका आवाजाला प्रतिसाद देणारा पंचबोल पॉइंट व इतरही पॉइंटचे अंतर शहरापासून दोन ते पाच किलोमीटर आहे. पॉइंटवर सुट्टीचे दिवस वगळता वर्दळ राहत नाही. या निवांतपणाची संधी साधून भीमकुंड पॉइंटच्या दरीत किमान २०, पंचबोलच्या दरीत १०, इतर ठिकाणी जवळपास ५० पर्यटकांनी आत्महत्या, तर अपघाताने ७५ च्या जवळपास पर्यटकांनी जीव गमावला.पर्यटनस्थळावरील विविध पॉइंटवर शनिवार-रविवारसह सुटीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सेल्फी फोटो घेताना खबरदार करणारे सुरक्षा फलक लावण्यात आले आहेत. सर्वच पॉइंटवर लोखंडी कठडे आहेत.सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, चिखलदरा

टॅग्स :Chikhaldaraचिखलदरा