लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जीममध्ये शरीरयष्टी बनविण्यासाठी सराव करताना अप्रशिक्षित ट्रेनरमुळे मुलीच्या पायाला गंभीर इजा झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी राजापेठ पोलिसांत केली. तथापि, हा फौजदारी गुन्हा होत नसल्यामुळे तक्रारकर्त्यांना ग्राहक मंचात जाण्याचा सल्ला राजापेठ पोलिसांनी दिला. या घटनेच्या अनुषंगाने शहरातील काही जीममध्ये अप्रशिक्षित ट्रेनरकडून प्रशिक्षणार्थींचा सराव घेतला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.तक्रारीनुसार, समर्थ कॉलनीतील रहिवासी गुंजन राकेश त्यागी (२३) हिने शरीरयष्टीसाठी रुक्मिणीनगर येथील मिस्टर बॉडी फॅक्टरी नावाच्या जिममध्ये २१ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रवेश घेतला. २२ ऑक्टोबर रोजी गुंजन नियमित सरावाकरिता जीममध्ये गेली. तिने तेथील महिला व पुरुष ट्रेनरने सराव कसा करावा, याबद्दल विचारणा केली. त्यांनी गुंजनला क्रॉस फिट जम्प करण्यास सांगितले. साध्या उड्या घेतल्यानंतर ती थकली. तिने आणखी उड्या घेण्यास असमर्थता दर्शविली. तरीही तिला क्रॉस फिट जम्प करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे तिने नाइलाजाने उड्या घेतल्या. यादरम्यान ट्रेनरने बॉडी बूस्ट है, असे म्हटले. त्याच वेळी गुंजनचा गुडघा फिरला आणि ती खाली कोसळून बेशुद्ध झाली. ती १५ मिनिटानंतर शुद्धीवर आली त्यावेळी फरशीवर पडून होती. जीम मॅनेजरने गुंजनला टॅबलेट दिल्या. तिने त्या पाण्यात विरघळून घेतल्या. मात्र, त्यानंतरही ती त्रासाने तासभर फरशीवरच पडून होती. जीम मॅनेजरने स्प्रे आणून गुंजनच्या गुडघ्यावर मारला. तिने आई-वडिलांना फोन करून जीममध्ये बोलावून घेतले. ते जीममध्ये पोहोचताच दोन्ही ट्रेनरने तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर गुंजनला आई-वडिलांनी खासगी रुग्णालयात नेले. तेथे एक्स-रे आणि एमआरआय काढल्यानंतर गुंजनच्या पायाचे लिगामेंट तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले.ट्रेनरने चुकीचा सराव घेतल्यामुळे गुंजन खाली पडली आणि बेशुद्ध झाली. तेथील अप्रशिक्षित ट्रेनरमुळेच ही घटना घडल्याचा आक्षेप गुंजनसह तिच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर त्यांनी जीमचे संचालक आणि ट्रेनरविरोधात राजापेठ पोलिसांत तक्रार दिली.गुंजनच्या पायाच्या लिगामेंटसाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली असून, तूर्तास तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मात्र, या घटनेच्या अनुषंगाने शहरातील जीममध्ये अप्रशिक्षित ट्रेनर सराव घेऊन नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत असल्याचे दिसून येत आहे.माझ्या जिममध्ये सर्टिफाइड ट्रेनर आहेत. ती मुलगी खोटे आरोप करीत आहे. जे घडले ते वाईट आहे. या घटनेला कुणी जबाबदार नसून, तो अपघात आहे.- राजेंद्र चांदूरकरसंचालक, मि. बॉडी फॅक्टरीमुलीची तक्रार प्राप्त झाली. मात्र, ही घटना गुन्हेविषयक नाही. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी ग्राहक मंचात दाद मागावी.किशोर सूर्यवंशीपोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे
अप्रशिक्षित ट्रेनरमुळे मुलीच्या पायाला गंभीर दुखापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 5:00 AM
समर्थ कॉलनीतील रहिवासी गुंजन राकेश त्यागी (२३) हिने शरीरयष्टीसाठी रुक्मिणीनगर येथील मिस्टर बॉडी फॅक्टरी नावाच्या जिममध्ये २१ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रवेश घेतला. २२ ऑक्टोबर रोजी गुंजन नियमित सरावाकरिता जीममध्ये गेली. तिने तेथील महिला व पुरुष ट्रेनरने सराव कसा करावा, याबद्दल विचारणा केली. त्यांनी गुंजनला क्रॉस फिट जम्प करण्यास सांगितले. साध्या उड्या घेतल्यानंतर ती थकली. तिने आणखी उड्या घेण्यास असमर्थता दर्शविली. तरीही तिला क्रॉस फिट जम्प करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे तिने नाइलाजाने उड्या घेतल्या.
ठळक मुद्देजीम संचालकावर आरोप : राजापेठ पोलिसांत तक्रार; चुकीच्या सरावामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ!