शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:10 AM

अमरावती : अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी देऊन एका तरुणीचे दुचाकीवर अपहरण करून तिला एका निर्जनस्थळी जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक ...

अमरावती : अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी देऊन एका तरुणीचे दुचाकीवर अपहरण करून तिला एका निर्जनस्थळी जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील रामपुरी कॅम्प परिसरात शनिवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला.

पोलीस सूत्रानुसार, राहुल बिशमदास गुलानी (राहणार रामपुरी कॅम्प) असे आरोपीचे नाव आहे. १९ वर्षीय तरुणीने यासंदर्भात गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी ही बी.कॉम. तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असून आरोपी हा मुलीच्या मोहल्ल्यात राहतो. मागील आठ ते नऊ महिन्यापासून तो मुलीला फोनवर त्रास देत होता. तिने त्याचा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला असता, आरोपीने दुसऱ्या क्रमांकावरून फोन करणे सुरूच ठेवले. त्याने तिला व्हाॅट्सॲप व सोशल मीडियावरसुद्धा मेसेज टाकून त्रास दिला. मुलगी शनिवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडली असता, ती पत्रकार कॉलनीतून दुचाकीने जात असताना आरोपीने तिला वाटेतच अडविले. तिची दुचाकी थांबवून त्याने चावी ताब्यात घेतली. त्यानंतर त्याने सोबत आणलेली ब्राऊन कलरची असिडची बॉटल तिला दाखवून ॲसिड अंगावर फेकतो, अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणी घाबरली. त्यानंतर त्याची दुचाकी तिथेच ठेवून तो तरुणीच्या दुचाकीवर बसला व तिला तिची दुचाकी सहकारनगरच्या दिशेने चालविण्यास सांगितली. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेऊन तिचे तोंड दाबून तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला. पीडिता घरी आल्यानंतर तिने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली. आरोपी सध्या फरार असून आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३६३, ३५४ (ड), ३४१, ५०६, ३२६ (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास गाडगेनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेखा लोंढे करीत आहेत.