शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

दोघींवर लैंगिक अत्याचार, एकीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 10:21 PM

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहर महिलाविषयक गंभीर गुन्ह्यांनी हादरले. एक अल्पवयीन मुलगी व एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला, तर दोन तरुणींचा विनयभंग करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये गाडगेनगर पोलिसांनी लैंगिक अत्याचारातील दोन आरोपींना अटक केली. खोलापुरी गेट हद्दीत विनयभंग प्रकरणातील आरोपी गजाआड करण्यात आला, तर गाडगेनगर हद्दीतील आरोपी अद्याप पसार आहे.

ठळक मुद्देमहिला दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात चार घटना : तीन आरोपी अटकेत, एक पसारमहिला असुरक्षितच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहर महिलाविषयक गंभीर गुन्ह्यांनी हादरले. एक अल्पवयीन मुलगी व एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला, तर दोन तरुणींचा विनयभंग करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये गाडगेनगर पोलिसांनी लैंगिक अत्याचारातील दोन आरोपींना अटक केली. खोलापुरी गेट हद्दीत विनयभंग प्रकरणातील आरोपी गजाआड करण्यात आला, तर गाडगेनगर हद्दीतील आरोपी अद्याप पसार आहे.गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात घुसून मद्यपीने महिलेची छेडखानी केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. पम्या हंबर्डे (रा. नवसारी) असे आरोपीचे नाव आहे. पीडिताच्या तक्रारीनुसार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आरोपी हा शिरला. त्याने महिलेला घरात एकटीच पाहून शिवीगाळ करून छेडखानी केली. महिलेने आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून गेले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पीडित महिलेने गाडगेनगर पोलिसांत गुरुवारी तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी शहरातील महिलांसह पुरुषांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. मात्र, पूर्वसंध्येलाच महिलाविषयक अत्याचार व छेडखानीच्या घटना पुढे आल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारगाडगेनगर हद्दीत राहणाऱ्या एका वृद्धेने अल्पवयीन नातीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची तक्रार गुरुवारी गाडगेनगर पोलिसांनी नोंदविली. वैभव बाळासाहेब देशमुख (रा. अंबागेट, बुधवारा चौक) हा घरी येत होता. घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने नातीसोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, अशी तक्रार आजीने नोंदविली. पोलिसांनी आरोपी वैभवविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ तसेच ४, ८, १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. उपनिरीक्षक शकंर डेडवाल यांनी प्राथमिक तपास केला.लग्नाचे आमिष दाखवून बलात्कारलग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने खासगी रुग्णालयातील परिचारिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी गाडगेनगर हद्दीत उघडकीस आली. पीडित मुलीचे वडील पोलीस खात्यात असून, त्यांच्या मित्रासोबत आरोपी निखिल गजभिये (२९, रा. परतवाडा) हा पीडिताच्या घरी येत होता. ओळखीतून निखिलने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळ्यात फासले. त्यानंतर जबरदस्तीने लैंगिक संबध ठेवल्याचा आरोप पीडिताने केला आहे. या घटनेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६(२), (एन) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.वडिलांकडून ‘बॅड टच’चा अनुभवखोलापुरी गेट ठाण्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या पित्यानेच वाईट नजर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वडील व मावशीच्या पतीने २०१४ पासून तर ३ मार्च २०१९ दरम्यान वाईट नजर ठेवून अंगाला वाईट हेतूने स्पर्श करणे, इच्छेविरुद्ध जबरदस्तीने जवळ बसविणे, केसातून व अंगावरून हात फिरविण्यासारखे प्रकार केल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी वडील व मावशीच्या पतीविरुद्ध भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ), सहकलम ८, १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.