अमरावती : जिल्ह्यात रविवारीही कोरोनाचा ब्लास्ट झालेला आहे. ७०९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २९,५२४ वर पोहोचली तर २४ तासांत उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सद्यस्थितीत संक्रमितांचे मृत्यूची संख्या ४६३ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाची लाट आली होती. त्यावेळी महिनाभरात साधारणपणे ७,५०० कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. त्यापेक्षाही यावेळी कोरोनाचा संसर्ग कित्येक पटीने जास्त आहे. फेब्रुवारीच्या २१ दिवसांत ७,५४५ नोंद सध्याच झालेली आहे. चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हीचे प्रमाण धक्कादायक असे ३५ ते ५५ टक्कयांच्या दरम्यान आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाने भयावह स्थिती निर्माण झालेली असतांना नागरिकांची बेफिकीरी जिल्ह्याच्या चितेंत भर घालीत आहे.
जिल्ह्यात हॉटस्पॉट असलेले अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर पालिका क्षेत्र आता जिल्हाधिकाºयांनी प्रतिबंधित क्षेत्रे घोषीत केल्याने या क्षेत्रासाठी आता स्वतंत्र आदेश आहेत. किंबहुना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने प्रत्येक नागरिकाने त्रिसुत्रीचे पालन करणे महत्वाचे आहे.
बॉक्स
महापालिका क्षेत्रात रविवारी सहा कंटेनमेंट जाहीर
महापालिका क्षेत्रात कोरोनाचे हॉटस्पॉट आढळून आल्याने आयुक्तांनी शनिवारी १२ कंटेनमेंट झोन घोषीत केले होते. तर रविवारी पुन्हा सहा कंटेनमेंट घोषीत केलेले आहे. यामध्ये कलोतीनगर, वनश्री कॉलनी, साधना कॉलनी, ललीत कॉलनी, न्यू कॉलनी, वडाळी, एसआरपीएफ कॅम्प व दस्तूर नगरचा समावेश आहे.
बॉक्स
कंट्रोल रुममध्ये २० शिक्षकांची नियुक्ती
महापालिकेत स्थायी समितीच्या सभागृहात सद्यस्थितीत होम आयसोलेशन रुग्णावर वॉच ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला व या कक्षात संबंधित रुग्णांसी संवाद साधण्यासाठी २० शिक्षकांची नियुक्ती आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली. हे रुग्ण घराबाहेर दिसल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहे.
बॉक्स
रविवारी तीन रुग्णांचा मृत्यू
०००००
०००००००००००
००००००००००००
००००००००००००००
बॉक्स
कोरोनाची जिल्हास्थिती
एकूण पॉझिटिव्ह : २९,५२४
अॅक्टीव्ह रुग्ण : ३,७०३
होम आयसोलेशन (महापालिका क्षेत्र) : १६०९
होम आयसोलेशन ( जिल्हा ग्रामीण) : १,०९७
एकूण मृत्यू : ४६३
रविवारी डिस्चार्ज : २५९
आतापर्यत कोरोनामुक्त :२५,८२१