शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शंकरबाबा पापळकर यांना डी.लिट.ने सन्मानित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 7:15 AM

Amravati news संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ शनिवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता आभासी पद्धतीने (ऑनलाईन मोड) संपन्न होत आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भूषवतील. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण देतील.

ठळक मुद्देयावर्षी दीक्षांत समारंभात मानद मानवविज्ञान पंडित (डी.लीट.) पदवी व गौरवपत्र समाजसेवक, दिव्यांग मुुला-मुलींचे कैवारी शंकरबाबा पापळकर यांना राज्यपालांच्यावतीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर हे प्रदान करतील. त्यांना विद्यापीठाच्यावतीने गौरविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ शनिवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता आभासी पद्धतीने (ऑनलाईन मोड) संपन्न होत आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भूषवतील. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण देतील. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करतील. विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर स्वागतपर व प्रास्ताविक भाषण करणार असून, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती गुरुवारी पत्रपरिषदेतून देण्यात आली.

अनाथांचा नाथ शंकरबाबांना डि.लिट.

अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर, बेवारस, बालगृह हा आश्रम शंकरबाबांनी सुरू केला असून, १२३ दिव्यांग मुला-मुलींना जगण्याचा आधार मिळाला आहे. यापूर्वी त्यांनी दिव्यांग २४ मुला-मुलींचे लग्नसुध्दा लावून दिले आहे. १२३ दिव्यांग मुला-मुलींचे वडील म्हणून त्यांनी स्वत:चे नाव दिले आहे. वझ्झर येथील आश्रमात १५ हजार विविध प्रजातींचे वृक्ष त्यांनी लावले आहेत.

१५४ पदके, पारितोषिकांची लयलूट

या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना ११० सुवर्णपदके, २२ - रौप्यपदके व २२ - रोख पारितोषिके असे एकूण १५४ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. दोन सुवर्ण पदकांसाठी आणि दोन रोख पारितोषिकांसाठी कोणीही पात्र ठरले नाही. या दीक्षांत समारंभात देण्यात येणा­ऱ्या पदके/पारितोषिकांसाठी मुलांमध्ये सर्वाधिक सुवर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोलाचा तेजस राठी याला सुवर्ण ५, रौप्य-१ व रोख पारितोषिक - १ व मुलींमध्ये सर्वाधिक सुवर्ण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची सारिका वणवे या विद्यार्थिनीला सुवर्ण- ६ व रोख पारितोषिक -१ घोषित झाले. ८३ विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये ६५ मुली, तर १८ मुलांचा समावेश आहे.

---------------------

टॅग्स :Shankarbaba Papalkarशंकरबाबा पापळकर