शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शंकर महाराजांच्या आश्रमात यापूर्वीही नरबळीचा प्रयत्न!

By admin | Published: August 19, 2016 12:12 AM

उकरावी तितकी घाण निघतच रहावी, असा काहीसा प्रकार शंकर महाराजांच्या आश्रमात घडत आहे.

३० जुलैची घटना : चर्मकार समाजाच्या अजयचा झोपेत ठेचला चेहरा ! अमरावती : उकरावी तितकी घाण निघतच रहावी, असा काहीसा प्रकार शंकर महाराजांच्या आश्रमात घडत आहे. मातंग समाजाच्या प्रथमेशचा गळा चिरून नरबळी देण्याच्या आडवडाभरापूर्वीच चर्मकार समाजाच्या ११ वर्षीय अजयचा दगडाने ठेचून नरबळी देण्याचा आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला. 'लोकमत'ने आरंभलेल्या शोधपत्रकारितेमुळे शंकर महाराजांच्या आश्रम परिसरातील अनेक खळबळजनक गुपिते उघड होऊ लागली आहेत. अजय सुनील वणवे हा चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथील मूळ रहिवासी. पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमांतर्गत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित विद्यालयात तो इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आहे. आश्रम परिसरातील समाजकल्याण वसतिगृहातच तो वास्तव्याला होता. विशेष म्हणजे अजय हा प्रथमेशचा जीवश्च-कंठश्च मित्र. जणू बंधूच. दोघेही एकाच वर्गात. अजय आणि प्रथमेश सोबतच झोपत असत. 'लोकमत'च्या शोधमोहिमेमुळे दुसराही गुन्हा उघड आश्रमात अजयवर ३० च्या मध्यरात्रीनंतर मृत्यूचा पाश आवळला गेल्यानंतरदेखील ३१ च्या सकाळी, तुमचा मुलगा स्वच्छतागृहात पाय घसरून पडला, असा फोन वसतिगृहातून करण्यात आला. पतीपासून विभक्त असलेली अजयची आई माहेरी वास्तव्याला आहे. प्रथमेशची आत्महत्या असल्याचे सांगणाऱ्या ग्रामीण पोलिसांचे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न 'लोकमत'ने शोधमोहिम सुरू करून हाणून पाडले. प्रथमेशचा अपघात नव्हे घातच, प्रयत्न अत्महत्येचा नव्हे हत्येचाच- हे बोचरे सत्य अखेर पुराव्यासकट पुढे आले. आश्रमात नरबळीचे भयानक वास्तव उघड झाले. 'लोकमत'मधून उघड होत असलेले वास्तव वाचून अजयवर झालेला हल्लाही त्याच उद्देशाने झाला असावा, असा संशय आई आणि आजोबांनाही काही दिवसांपासून येऊ लागला. त्यांनी तशी भावना व्यक्त करणे सुरूही केले होते. प्रथमेशचा नरबळी हा एकमेव प्रकार नसल्याचा आणि अटक करण्यात आलेले आरोपी अंतिम नसल्याचा मुद्दा 'लोकमत'ने शोधमोहिमेतून लोकदरबारात मांडला आहे. पोलिसांनीही त्या दिशेने तपास केल्यावर सुरेंद्रने अजयवर केलेला हल्ला कबूल केला. 'लोकमत'च्या शोधमोहिमेमुळे आश्रमात घडलेला हा दुसरा भयंकर गुन्हा उघड होऊ शकला. अजयच्या आईने मंगरूळ दस्तगीर पोलिसांत तशी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचा प्रयत्न आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये सुरेंद्रविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. याच सुरेंद्रने प्रथमेशचा गळा कापला.