शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

पुन्हा संचारणार शंकरपटाचा उत्साह

By admin | Published: April 13, 2017 12:15 AM

शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते.

तळेगावात आनंद : कायद्याचे सावट निवळले, ऐतिहासिक स्पर्धेला संजीवनीतळेगाव दशासर : शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते. यानिर्णयामुळे तळेगावच्या शंकरपटास गतवैभव प्राप्त होणार आहे. मागील तीन वर्षांपासून तळेगावचा प्रसिद्ध शंकरपट भरला नसल्याने नैराश्याचे वातावरण होते. विशेष म्हणजे यामुळे शेतीपुरक व्यवसायावरही मोठा परिणाम झाला होता. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तळेगावच्या शंकरपटावर तीन वर्षांपूर्वी न्यायालयाच्या निर्णयामुळे बंदी आली होती. येथील शंकरपटाला शंभर वर्षांचा इतिहास आहे. कृषक सुधार मंडळाद्वारे सुरू करण्यात आलेला हा ऐतिहासिक शंकरपट दरवर्षी संक्रातीच्या मुहूर्तावर १५ ते १८ जानेवारीपर्यंत येथील बसस्थानकाच्या उत्तरेस असलेल्या २७ एकर शासकीय जागेत भरविण्यात येतो. देशातील पहिला महिला शंकरपट देखील याच ठिकाणी दहा वर्षांपूर्वी भरविण्यात आला होता. तेव्हापासून येथील शंकरपटात महिला देखील सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कुस्ती स्पर्धा व पटेश्वर यात्रा देखील भरविली जाते. केवळ स्पर्धेसाठीच नव्हे तर या शंकरपटाच्या माध्यामतून अनेक शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यावर येथे येणाऱ्यांचा भर असतो. शंकरपटात शेतीपयोगी सर्वच साहित्य, करमणुकीची साधने, बैलबाजार, पशू प्रदर्शनी, बचतगट स्टॉल आदींचा भरणा असल्याने यापटाला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होते आणि येथे कोट्यवधींची उलाढालही होते. शासनाने २७ एकर शासकीय जमीन दहा दिवसांसाठी शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रमासाठी राखून ठेवली आहे. आ. जगताप यांच्या प्रयत्नाने यात्रेचे उत्पन्न कृषक सुधार मंडळास मिळवून दिले आहे. (वार्ताहर)बैलांवर अन्याय नाहीराज्यातील पटशौकीन आपल्या नामांकित जोड्या घेऊन येथे लवाजाम्यासह डेरेदाखल होतात. तसेच लांबून व्यापारी, ग्राहक व शेतकरी लाखोंच्या संख्येने पटात सहभागी होत असतात. या शंकरपटात बैलांवर कोणताही अन्याय होत नाही व जोडी हाकताना पुराणी, आरू व काठीचा वापर करण्यास धुरकऱ्यास सक्त मनाई कृषक सुधार मंडळाने केली आहे. शंकरपट सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. परंतु, पटविरोधक सुप्रीम कोर्टात गेल्यास अडचण येऊ नये. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना विश्वासात घ्यावे. - आ.वीरेंद्र जगताप,धामणगावहा पट अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्याचे भूषण आहे. या शंकरपटाला आजपर्यंत कोणतेही गालबोट लागले नाही. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. - रावसाहेब देशमुख, कृषक सुधार मंडळ