लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मिल चालू करा किंवा शंभर टक्के वेतन द्या, या दोन मागण्यांसाठी २४ दिवसांपासून येथील फिनले मिल कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे. परंतु प्रशासनातर्फे कुठलीच दखल घेत नसल्याने बुधवारी मिलच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामगारांनी मुंडण आंदोलन करून निषेध व्यक्त केला.फिनले मिल कामगारांचे पूर्ण वेतन द्या, मिल सुरू करा, या मागणीसाठी गिरणी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, शासन व मिल प्रशासन त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. कामगरांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी फिनले मिलच्या प्रवेशद्वारासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासन व प्रशासनाने आंदोलनाची दाखल न घेतल्यास गिरणी कामगार संघ आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा देण्यात आला. मुंडण आंदोलनात कामगार संघटनेचे अध्यक्ष अभय माथाने, राजेश ठाकूर, धर्मराज राऊत, आशिष सातपुते, धनंजय लव्हाळे, हेमराज सुरमरे, प्रमोद विखार, सूरज शुक्ला, धीरज मेहरे, रवींद्र बन्सोड, शुभम इंगळे आदींनी सहभागी होते.
फिनले कामगारांचे मुंडण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 5:00 AM
फिनले मिल कामगारांचे पूर्ण वेतन द्या, मिल सुरू करा, या मागणीसाठी गिरणी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, शासन व मिल प्रशासन त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. कामगरांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी फिनले मिलच्या प्रवेशद्वारासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठळक मुद्दे२४ दिवसांपासून साखळी उपोषण : प्रशासनाकडून बेदखल