लोकमत वृत्ताची दखल : गुप्त दानशुराने दिला पाच हजारांचा धनादेशधारणी : ‘लोकमत’ने १७ डिसेंबर २०१५ रोजीच्या वृत्तात उल्लेखीत ८० टक्के जळालेल्या त्या महिलेला आर्थिक मदतीचा हात सद्या मुंबईस्थीत परंतु मुळचे अमरावती जिल्ह्यातील निवासी असणाया ‘त्या’ गुप्त दानशुर व्यक्तीने लोकमत प्रतिनिधीच्या माध्यमातून पाच हजार रुपयाचे धनादेश दिला. व अजुनही समाजात मानुसकी जीवंत असल्याचा परिचय दिला. कविता मथुरादास पटोरकर हिला तिच्या सासरच्यांनी होळी सणात जीवंत जाळण्याचा प्रकार केला. यात ती ८० टक्के भाजली गेली. मात्र तिच्या प्रबळ ईच्छाशक्तीच्या व जीवन जगण्याच्या इच्छेने ती अशाही अवस्थेत मृत्युशी झुंज देत आहे. १६ डिसेंबर रोजी ती धारणी न्यायालयात खावटी व कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात स्वत: उपस्थि झाली होती. त्यावेळी तिची वेदना ‘लोकमत’ने समाजमनासमोर समोर आणली.या वृत्ताची दखल थेट मुंबईत राहणाऱ्या लोकमत वाचकाने घेतली. ते मुळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचं मेळघाटशी घट्ट नातं आहे. त्यांनी वृत्त वाचताच घटनेची सविस्तर माहिती ‘लोकमत’चे संपादकीय विभाग प्रमुख गणेश देशमुख यांचे कडून जाणून घेतली. तिला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा लोकमत प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधून कविताच्या आई-वडिलांशी चर्चा घडवून आणली. व मदतीचा होकार मिळताच त्यांनी या प्रतिनिधीच्या पत्त्यावर पाच हजारांचा धनादेश कविताची आई गेंदुबाई वासुदेव कस्तुरे यांच्या नावे पोष्टाद्वारे पाठविला.हा धनादेश शुक्रवारी गेंदुबाईला न्यायालयात बोलावून धारणी बार असोसिएशनचे अध्यक्ष सत्यदेव गुप्ता व सचिव राजू गोवडाणे यांचे उपस्थितीत देण्यात आला. यावेळी कविताच्या आई-वडिलांनी त्या दानदात्याचे आभार व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)
अखेर तिला मिळाला मदतीचा हात
By admin | Published: January 17, 2016 12:05 AM