अमरावती : इव्हनिंग वॉकला गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा पाठलाग करून त्याची दुचाकी व मोबाईल पळविण्यात आला होता. ती दुचाकी २० ऑगस्ट रोजी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस स्थितीत आढळून आली. शुक्रवारी सकाळी राजापेठ पोलीस ठाण्यात ती दुचाकी आणण्यात आली. १६ ऑगस्ट रोजी एकनाथपूरम भागातील उद्यानाजवळ ही घटना घडली होती. अज्ञात चार जणांनी आपल्याला आधी छत्रीतलाव परिसरात मारहाण केली. नंतर पाठलाग करून आपल्याला उद्यानाजवळ गाठले, तथा ते आपली दुचाकी व मोबाईल घेऊन पसार झाले, अशी तक्रार १७ वर्षीत मुलाने १७ ऑगस्ट रोजी राजापेठ ठाण्यात नोंदविली होती. दरम्यान, आरोपींनी त्याचदिवशी फिर्यादीची एमएच २७ बीके ५८३० ही दचाकी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी बेवारस टाकून दिली. दरम्यान शहरात पाऊस झाल्याने त्या दुचाकीवरील ठसे मिटल्याची शक्यता वर्तविण्यात आली. दुचाकीसोबतच मोबाईलदेखील मिळाला. राजापेठ पोलिसांनी चारही आरोपींचा कसून शोध चालविला आहे.
‘ती’ दुचाकी मिळाली नागपुरी गेट हद्दीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:17 AM