मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामनगाव रेल्वे : सततची नापिकी व कर्जाने त्रस्त धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामगाव येथील गौतम बनसोड या शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. पत्नी व दोन चिमुकल्यांसह मृत गौतमचा संसार अचानक उघड्यावर आला. परंतु जीवन संघर्ष अर्ध्यावर न सोडता गौतमची पत्नी संगीताने खडतर लढा दिला व आज तिच्या या जिद्दीला भलेभले सलाम करीत आहे. तिची शेतीकरण्याची जिद्द महिलासाठी नव्हे, तर पुरषांसाठीही एक आदर्श ठरत आहे. संगीता बनसोडने संघर्षातून यशाची शर्यत जिंकली आहे.एक हजार लोकसंख्या असलेल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामगाव येथील संगीता बनसोड नावाची शेतकरी महिला आपल्या शेतामध्ये सध्या राब राब राबते. तिच्या सोबतीला तिचे दोन लहान मुले लहान मुलगा आदित्य १० वीत शिकतो, तर मोठा राहुल आयटीआयला आहे. २०१५ ला गौतम बनसोडने नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून बँकेच्या ५० हजार रुपयांच्या कर्जामुळे त्यांनी जीवनयात्रा संपविली. या घटनेने हदरलेल्या तिच्या दोन मुलाचे काय, हा प्रश्न कायम होता. नियतिशी दोन हात करण्याचा निर्णय घेऊन तिने जीवन लढा कायम ठेवला. घरातील अडीच एकर शेतीत राबणे सुरू केले. कुणाच्याही मदतीची वाट न पाहता मुलगा राहुल व आदित्य यांनी शिक्षणासह आईला शेती कामात मदत सुरू केली. आज संगीता बनसोड या रनरागिणीचा सुरु असलेला लढा पाहून गावकारी सलाम करीत आहेत.गौतम बनसोडने सन २०१५ मध्ये शेतात सोयाबीन पेरले होते. मात्र पिकांचे नुकसान झाले त्यामुळे बँके कर्ज कसे फेडायचे, घर कसे चालवयाचं ही चिंता त्याला वारंवार सतावत होती. त्याला रात्री झोप येत नव्हती. अखेर त्याने एक दिवस त्याने फवारणीसाठी आणलेले किटक नाशक प्राषण करून आपली जीवनयात्रा संपविलीपतिवियोगाचे दु:ख, तर संगीताला आहेच. मात्र आता रडत बसायचे सोडून कामासाठी पदर खोचला आहे. आता तिने ही ठरवले कि स्वत: शेती करायची आज संगीता स्वत: शेतात जाऊन राबते मागील वर्षी सोयाबीन चे पीक आपल्या शेतात घेतले आणि त्यात तिला ब?्या पैकी नफा झाला यावर्षी संगीतानं आपल्या अडीच एकर शेतात सोयाबीन पेरले असून या वर्षीसुद्धा तिला मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, अशी अपेक्ष संगीताला आहे आणि यात तिला मदत करतात. तिचे दोन चिमुकले मुल सतत तिच्या सोबत असतात. त्यासाठी ती आपल्या अभ्यासासोबत तिच्या आईला शेतात मदत करतात.गौतमच्या आत्महत्येनंतर गावकºयांनी सांगीताला मदत करायचे ठरवले. मात्र ती मदत संगीताने स्वीकारली नाही. स्वाभिमानी म्हणत ती स्वत: शेतात राबायला लागली आज संगीताताई उत्तम प्रकारे शेती करत असून ती पूर्ण पणे एकटीच शेती साभांळत आहे. पतींच्या आत्महत्येनंतर ह्य ती खचून ना जाता आज ती स्वत:च शेतात राबत आहे
संघर्षातून जिंकली तिने यशाची शर्यत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:19 PM
सततची नापिकी व कर्जाने त्रस्त धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामगाव येथील गौतम बनसोड या शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली.
ठळक मुद्देमहिला शेतकरी संगीता बनसोडचा जीवन संघर्ष : कर्जाला कंटाळून पतीची आत्महत्या