लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील ५५ वर्षीय इसमाला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नागपूर किंवा अमरावतीला पाठवायचे होते. मात्र, वेळीच १०८ रुग्णवाहिकेच्या कॉल सेंटरला फोन लावला असता सदर रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. मोर्शीहून येण्यात दोन तास लागेल, असे सांगण्यात आले. सदर रुग्णवाहिका दवाखान्यातच उभी असताना नादुरुस्त कशी किंवा मोर्शीहून ३५ किमी अंतर कापण्यास दोन तास कसे लागतात, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मृताच्या नातेवाईकाने जोपर्यंत १०८ रुग्णवाहीकेच्या संबंधितातवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.प्राप्त माहितीनुसार, शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील रुग्ण सुरेश सिताराम दवंडे ५० हे अचानक आजारी झाल्याने ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी उपचार करून रुग्णाला नागपूर किंवा अमरावती येथे पुढील उपचारासाठी नेण्यास सांगितले. यावेळी संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्कसाधला तेव्हा वरुड येथे कार्यरत रूग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे मोर्शीहून येण्यास दोन तास लागतील, असे सांगितले. रुग्णाचे नातेवाईक सेंकदागणिक वाट पाहत होते. परंतु रूग्णवाहिका आली नाही. अखेर सुरेश सिताराम दवंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कदाचित १०८ रूग्णवाहिका वेळेवर आली असती तर त्यांचे प्राण वाचले असते.
शेंदूरजनाघाटच्या रुग्णाचा १०८ रुग्णवाहिकेअभावी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:51 PM
तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील ५५ वर्षीय इसमाला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नागपूर किंवा अमरावतीला पाठवायचे होते. मात्र, वेळीच १०८ रुग्णवाहिकेच्या कॉल सेंटरला फोन लावला असता सदर रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. मोर्शीहून येण्यात दोन तास लागेल, असे सांगण्यात आले.
ठळक मुद्देसेवा निष्फळ : तणावपूर्ण वातावरण