शेंदूरजनाघाट : विषय समिती सभापती निवडीसाठीची विशेष सभा शुक्रवारी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तत्पूर्वी १० ते १२ वाजेपर्यंत सभापती साठीचे नामनिर्देशन अर्ज मागविण्यात आले. पालिकेत विदर्भ जनसंग्राम ८, काँग्रेस ४, राष्ट्रवादी ४ व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात विदर्भ जनसंग्राम ८ व काँग्रेस ४ अशी १२ न.प. सदस्यांची नगरविकास आघाडी स्थापन करुन सुभाष घुरडे नगराध्यक्ष तर लिलाधर डोईजोड उपाध्यक्ष होते. मात्र अडीच वर्षांच्या टर्मनंतर दुसऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीत रुसवे, फुगवे झाल्याने युती तुटून विदर्भ जनसंग्राम ८, काँग्रेस १ व अपक्ष १ अशी १० सदस्यांची नगरविकास आघाडी स्थापन झाली. समितीच्या अध्यक्षपदी विदर्भ जनसंग्रामच्या सरिता खेरडे या तर काँग्रेसचे देवानंद जोगेकर उपाध्यक्ष झाले. पालिकेचे उपाध्यक्ष देवानंद जोगेकर पाणीपुरवठा व जल नि:सारण समितीचे पदसिध्द सभापती असल्याने उर्वरित विषय समिती सभापतींच्या निवड प्रक्रियेला सुरूवात केली. सत्तारुढ नगरविकास आघाडीच्यावतीने बांधकाम व नियोजन समितीचे सभापती म्हणून अपक्ष जयप्रकाश भोंडेकर व शिक्षण आणि आरोग्य समिती सभापती म्हणून शोभा शरद पाटील यांचे अर्ज दाखल केले. मात्र राष्ट्रवादीचे गटनेते मोहन गणोरकर यांनी या दोन्ही समितींसाठी अर्ज न आल्याने जयप्रकार ज्ञानेश्वर भोंडेकर व शोभा शरद पाटील यांना विजयी घोषित केले. महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून राकाँच्या नीलिमा वऱ्होकर, उपसभापतीसाठी काँग्रेसच्या कल्पना सुभाष भंडारे यांचे अर्ज दाखल झाले. मात्र, सुभाष गोरडे यांनी या समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल न केल्याने राष्ट्रवादीच्या नीलिमा नीळकंठ वऱ्होकर, उपसभापती काँग्रेसच्या कल्पना सुभाष भंडारे यांना विजयी केले. स्थायीच्या अध्यक्षस्थानी सरिता अरुण खेरडे, विविध विषय समिती सभापतींची अविरोध निवड संपन्न झाल्याने स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सरिता अरुण खेरडे, सदस्य म्हणून उपाध्यक्ष तथा सभापती पाणीपुरवठा, जल नि:सारण समितीचे देवानंद रामकृष्ण जोगेकर, बांधकाम व नियोजनचे सभापती जयप्रकाश भोंडेकर, शिक्षण व आरोग्य सभापती शोभा शरद पाटील व मबाक सभापती निलीमा वऱ्होकार विजयी झाल्या.
शेंदूरजनाघाट विषय समिती सभापती अविरोध
By admin | Published: January 17, 2015 1:01 AM