जयप्रकाश भोंडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कशेंदूरजनाघाट : स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत स्वच्छता अॅपच्या सदुपयोगावर आधारित डायनॅमिक रँकिंगमध्ये शेंदूरजनाघाट नगर पालिका टॉप टेनमध्ये आली आहे. विशेष म्हणजे, देशभरातील चार हजारांपेक्षा अधिक महापालिका, नगर पालिका व नगर पंचायतींचा समावेश असलेल्या या रॅकिंगमध्ये शेंदूरजनाघाट पालिका सहाव्या क्रमांकावर असल्याने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये शहराचे गुणांकन उत्तम राहण्याचे संकेत आहेत.देशभरातील स्वच्छ शहरांचे गुणांकन करण्यासाठी सलग चौथ्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण केंद्राने हाती घेतले आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणी ४ जानेवारीपासून सुरू झाली. स्वच्छता अॅपच्या वापरासाठी सुमारे ४०० गुण आहेत.स्वच्छता अॅप किती नागरिकांनी डाऊनलोड केलेत, वापरकर्त्यांचा सहभाग, संबंधित नागरी स्वराज्य संस्थेचे जबाबदारी व वापरकर्त्याचा अभिप्राय या चार घटकांवर स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान ४००० शहरांचे डायनॅमिक रॅकिंग ठरविण्यात येते. ११ आॅगस्ट २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत संबंधित शहरांनी किती संख्येत स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यावर अस्वच्छतेविषयक तक्रारी केले, संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्या तक्रारींची किती कालावधीत सोडवणूक केली व त्यानंतर संबंधित तक्रारकर्ता वा वापरकर्त्याने तक्रार व सोडवणुकीबाबत कसा अभिप्राय दिला, या चार घटकांवर ४०० गुणांची मदार आहे.शेंदूरजनाघाट नगरपालिका चार हजार शहरांच्या तुलनेत या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात शेंदूरजनाघाट पालिका नागरिकांचा प्रतिसाद या घटकात दुसरा क्रमांक पटकाविला होता. स्वच्छता अॅपच्या डायनॅमिक रॅकिंगमध्ये पहिल्या सहामध्ये आल्याने स्वच्छ सर्वेक्षणात शेंदूरजनाघाट पालिकेचे ४०० पैकी किमान ३५० गुण निश्चित झाले आहेत.उद्दिष्टापेक्षा अधिक स्वच्छता अॅपस्वच्छ सर्वेक्षणात सहभागी प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के स्वच्छता अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक होते. शेंदूरजनाघाट पालिकेने उद्दिष्टपूर्तीच्या १०८७ च्या तुलनेत १११३ स्वच्छता अॅप डाऊनलोड करवून घेऊन १०० टक्के गुण मिळविले आहेत.
शेंदूरजनाघाट ‘टॉप टेन’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 10:56 PM
स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत स्वच्छता अॅपच्या सदुपयोगावर आधारित डायनॅमिक रँकिंगमध्ये शेंदूरजनाघाट नगर पालिका टॉप टेनमध्ये आली आहे. विशेष म्हणजे, देशभरातील चार हजारांपेक्षा अधिक महापालिका, नगर पालिका व नगर पंचायतींचा समावेश असलेल्या या रॅकिंगमध्ये शेंदूरजनाघाट पालिका सहाव्या क्रमांकावर असल्याने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये शहराचे गुणांकन उत्तम राहण्याचे संकेत आहेत.
ठळक मुद्देडायनॅमिक रँकिंग : स्वच्छ सर्वेक्षण-२०१९