लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचद्वारा सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर राहुटी मोर्चा काढण्यात आला. मेंढ्या, बैलगाड्यांसह दोन हजारांवर धनगर समाजबांधवांनी मोर्चाद्वारे शासनाचा लक्ष्यवेध करीत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या दिला.शासनाने ३० जून २०१८ ला थांबविलेली शेळी-मेंढीची निर्यात बंदी तातडीने हटवून कायमस्वरूपी परवानगी द्यावी. मेंढपाळ धनगरांना वृक्ष लागवड करण्याच्या अटीवर १०० मेंढ्याकरिता २० एकर वनक्षेत्रातील जमीन देण्यात यावी यासंदर्भात निर्णय होत नाही तोवर मागणीनूसार वनजमिनीवर चराईला बंदी करू नये, राळेगावचे ठाणेदार खंदाळेंना बडतर्फ करा व मेंढपाळांवर खोटी तक्रार मागे घ्या, वनकर्मचाऱ्यांना निलंबित करा, आदी मागण्यांसाठी विदर्भ मेंढपाळ विकास मंचचे अध्यक्ष संतोष महात्मे, जिल्हाध्यक्ष जानराव कोकरे, मेघश्याम करडे यांच्या नेतृत्वात हा राहुटी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला आ. जितेंद्र आव्हाड, आ. विद्या चव्हाण, सुरेखा ठाकरे आदींनी मार्गदर्शन केले. हा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात लावून धरणार असल्याचे सांगितले. यावेळी संदीप धवने, श्रीधर मोहोड, नथ्थू महारनर, अजीज पटेल, सरला इंगळे, शरद शिंदे, हरिभाऊ शिंदे, रतन यमगर, गुणवंत कोकरे, वामन दगडू शिंदे, तुकाराम यमगर, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे. सुदाम अण्णा लोंढे, धरम पवार, हरीश खुने, सुभाष बुदे, शरद उरकुडे, गजानन कापडे, प्रशांत हलके, श्रीधर मोहोड, संदीप धवणे, रमेश मातकर यांच्यासह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
मेंढपाळांची विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:05 AM
विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचद्वारा सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर राहुटी मोर्चा काढण्यात आला. मेंढ्या, बैलगाड्यांसह दोन हजारांवर धनगर समाजबांधवांनी मोर्चाद्वारे शासनाचा लक्ष्यवेध करीत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या दिला.
ठळक मुद्देराहुटी आंदोलन : विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंच आक्रमक