कर्मचारी वैतागले; वेतन वेळेवर होत नसल्याने विविध अडचणी
अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या लालपरीचे आर्थिक नियोजन कोलमडले असून अमरावती विभागातील ८ आगारात कार्यरत तब्बल २,५०४ कर्मचाऱी आणि ३० अधिकारी कार्यरत आहेत. जुलै महिन्याचे वेतन अद्यापही हातात न पडल्याने कर्मचारी कुटुंबाची परवड सुरू आहे.
कोरोनाने एसटी महामंडळाचे अर्थचक्र रुतले असून यातून महामंडळाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. कोरोनामुळे मध्यतरी एसटी बसेस बंद होत्या. त्यानंतर अनलाॅकमध्ये बसेस ५० टक्के क्षमतेने चालविल्या. मात्र प्रवाशाचा प्रतिसाद कमी होता. उत्पन्नावरही परिणामी झाला. आता बसेस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. मात्र, मोजक्याच मार्गावर प्रवासी प्रतिसाद आहे. ग्रामीण भागातून प्रतिसाद कमी आहे. खर्च जास्त अन उत्पन्न कमी अशी स्थिती आज महामंडळाची आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही तिढा निर्माण होत आहे. अद्याप जुलैचे वेतन झालेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बॉक्स
उसनवारी तरी किती करायची?
कोट
महामंडळाची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. अशा स्थितीत महामंडळाला मोठी कसरत करावी लागत आहे. कोरोनाकाळात अनेकदा वेतन थकले. अद्याप जुलै महिन्याचे वेतन थकले असून उसनवारी करून जगावे लागत आहे.
मोहीत देशमुख
विभागीय सचिव एसटी कामगार संघटना
कोट
ग्रामीण भागातील काही प्रमुख मार्गावर प्रवासी सेवा सुरू आहे. मोजक्याच मार्गावर प्रवासी प्रतिसाद लाभत आहे.कोरोना काळात बसेस बंद होत्या. त्यावेळी वेतन उशिरा मिळेला मात्र आता परिस्थितीत सुधारली आहे.त्यामुळे वेतन वेळेवर मिळणे आवश्यक आहे.
बाळासाहेब राणे
विभागीय कार्याध्यक्ष एसटी कामगार सेना
बॉक्स
उत्पन्न कमी खर्च जास्त
अमरावती विभागात ८ आगारात ३६८ एसटी बसेसची संख्या असून २५०३ एकूण कर्मचारी कार्यरत आहेत.लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या बसेस घाटयात आहेत. मात्र प्रवाशांची सोय म्हणून हा तोटा सहन करून प्रवासी सेवा दिली जात आहे. मात्र उत्पन्नाचा गाडा अद्याप रूळावर आलेला नाही. यातून वेतनाचा प्रश्न आहे.
कोट
अमरावती विभागात ८ एसटी आगार २५०४ कर्मचारी कर्तव्यावर आहे. सध्याला जुलै महिन्याचे वेतन थकले आहे. विभागाला महिन्याला वेतनापोटी जवळपास ६ कोटीचा निधी लागतो.. थकले वेतन देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
श्रीकांत गभने विभाग नियंत्रक अमरावती
बॉक्स
आकडे काय सांगतात?
अमरावती -३३८
बडनेरा-२२६
परतवाडा-३३७
दर्यापूर-३००
चांदूर बाजार-२२१
मोशी-२१७
वरुड-२३६
चांदुर रेल्वे-२२६