आॅनलाईन लोकमतअमरावती : एमबीबीएस करीत असलेल्या महाराष्ट्रीय, विशेषत: वैदर्भीय विद्यार्थ्यांनी फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये शिवजयंती साजरी केली. अमरावतीकर समीर विश्वासराव देशमुख याने विद्यार्थ्यांना एकत्र करून भगवा झेंडा सातासमुद्रापार नेला.फिलिपिन्समध्ये मेडिकल स्टुडंट आॅफ महाराष्ट्र हा ग्रुप स्थापन करून सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी तन्मय बडगुुजर (अकोला), अजित मडगे (अमरावती), शुभम वानखडे (वर्धा), रोहन जाधव (पुणे), शोम सावजी, प्रज्वल पाचगडे (बुलडाणा), वसुंधरा पवार (मुंबई), जागृती बडगुजर (अकोला), सन्मती काळे (बुलडाणा), पीयूष चौधरी (अमरावती), रमीझ शेख (वर्धा), राठोड (नागपूर), इशांत केचे (वर्धा), सागर शिंदे (बुलडाणा), शुभम वानखडे, रोहित बडगुजर, अजित मडगे यांच्यासह ७० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची जबाबदारी संभाळली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार परदेशी न्यावे व महाराष्ट्रातील संस्कृती विदेशातही जपली जावी, हीच आयोजनामागे भूमिका असल्याचे समीर देशमुख यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.साहित्य आणले विदर्भातूनशिवजयंतीनिमित्त सोशल मीडियाचा वापर करून महाराष्ट्रातील ६०० ते ७०० विद्यार्थ्यांपर्यंत मॅसेज पोहचविण्यात आला. शिवजयंतीसाठी बैठकही पार पडली व यासाठी विदर्भातूनच शिवाजी महाराजांची मूर्ती, पोषाक, भगवे झेंडे, व फेटेसुद्धा आणण्यात आले होते.
फिलिपिन्समध्ये शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:22 PM
एमबीबीएस करीत असलेल्या महाराष्ट्रीय, विशेषत: वैदर्भीय विद्यार्थ्यांनी फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये शिवजयंती साजरी केली. अमरावतीकर समीर विश्वासराव देशमुख याने विद्यार्थ्यांना एकत्र करून भगवा झेंडा सातासमुद्रापार नेला.
ठळक मुद्दे६०० विद्यार्थ्यांचा सहभाग : अमरावतीच्या विद्यार्थ्यांचे आयोजन