लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही स्लीपर कोच बसेसचे भाडे कमी करण्यास एसटीच्या संचालक मंडळ आणि परिवहन आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिवशाही शयनयान बसच्या भाड्यात आता प्रतिटप्पा तीन रुपयांची कपात केली जाणार आहे.१२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून ही भाडेकपात लागू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वस्त दरात आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे. अमरावती ते पुणे या मार्गावर सध्या १५९५ इतके भाडे आहे. ते आता ११९० रुपये होईल. यात ४०५ रुपयांची कपात झाली आहे. अमरावती ते पंढरपूरपर्यंतचे प्रवासभाडे १४८० रुपये होते. आता ११०५ रुपये प्रवासभाडे आकारले जाणार आहेत. यामध्ये ३७५ रुपये प्रवास भाड्यात कपात करण्यात आली आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी एसटीने एसी स्पीपर कोच शिवशाही ताफ्यात आणल्या. राज्यातील ३६ मार्गावर त्या चालविण्यात येतात. परंतु, खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत शिवशाहीचे तिकीट जास्त होते. प्रवासी स्लीपर कोचने रात्रीच्या वेळी प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, शिवशाही बसेस सायंकाळी पाच अथवा सहा वाजता सोडली जाते. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्याडे पाठ फिरविली होती. प्रवासी संख्या वाढावी, यासाठी एस.टी. महामंडळाने तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी प्रवासाच्या पहिल्या टप्प्यासाठी आकारले जाणारे किमान भाडे १८ रुपये होते, ते आता १५ रुपये राहील.अशी झाली प्रवास भाड्यात कपातअमरावती-पुणे जुने दर १५७५ व कपातीनंतर नवीन दर ११८० आहेत. अमरावती-पंढरपूर भाडे १७०५ वरून १२७५ रुपये केले आहे. अमरावती ते नाशिकसाठी १४८० ऐवजी ११०५ रुपये भाडे आकारले जाणार आहे. याशिवाय अमरावती ते औरंगाबाद ९५५ रुपयांऐवजी आता ७१५ रूपये प्रवास भाडे दरकपातीनंतर आकारले जाणार असल्याचे मध्यवर्ती बसस्थानकाचे आगारप्रमुख नितीन जयस्वाल यांनी सांगितले.२३० ते ५०५ रूपयांची कपातराज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती, खासगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा, या उद्देशाने ही दरकपात करण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घोषित केले. त्यानुसार भाडेदरात २३० ते ५०५ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.एस.टी. महामंडळाने प्रवाशांच्या हितासाठी वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना, तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच दिली आहे. आता तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार आहे.- श्रीकांत गभणेविभागीय नियंत्रक
शिवशाही शयनयान बसभाड्यात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:11 PM
एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही स्लीपर कोच बसेसचे भाडे कमी करण्यास एसटीच्या संचालक मंडळ आणि परिवहन आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिवशाही शयनयान बसच्या भाड्यात आता प्रतिटप्पा तीन रुपयांची कपात केली जाणार आहे.
ठळक मुद्देएसटी महामंडळ : किमान २३० ते ५०५ रुपयांची घट