मनीष तसरे, अमरावती: खरीप हंगामाची लगबग सध्या सुरू आहे. अशातच अमरावती शहरात जाणीवपूर्वक कृषी सेवा केंद्र दुकानदार खतांचा कुत्रिम तुटवडा निर्माण करत आहे किंवा खतांचा काळाबाजार करून ज्यादा दराने युरियाची विक्री करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यामुळे थेट अमरावती शहरातील कृषी केंद्र दुकानात ठाकरे गटांच्या शिवसैनिकांनी धडक देत शेतकऱ्यांना युरिया नाकारल्याने एका कृषी केंद्र संचालकाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे या ठिकाणी दुकानात जोरदार राडा निर्माण झाला होता.
दरम्यान, यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. मारहाणीच्या निषेधार्थ कृषी केंद्र संचालकांनी दुकाने बंद करत पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर मारहाण केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी कृषी केंद्र संचालकांनी केली आहे.