शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

शिवसेनेकडून भाजप कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 5:00 AM

संकुलाच्या बेसमेंटमध्ये एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी हाती डिझेलची कॅन घेऊन भाजप कार्यालयावर हल्लाबोल केला. तेथील बॅनर, पोस्टर फाडून टाकले. काही जाळले. पाण्याच्या जारची तोडफोड करण्यात आली. नामफलकावर शाई फेकण्यात आली. काहींनी दगडफेक केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. सुमारे अर्ध्या तासाच्या या तडक आंदोलनाची शिवसैनिकांकडूनच व्हिडीओ शूटिंग करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद अमरावतीतदेखील उमटले. शिवसेनेचे महानगरप्रमुख पराग गुडधे, श्याम धाने व अन्य शिवसैनिकांनी भाजपच्या राजापेठ स्थित कार्यालयाच्या आवारातील फलकांची जाळपोळ केली. तेथे दगडफेक करून भाजप व राणेंविरोधी नारेबाजी करण्यात आली. मंगळवारी सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. संकुलाच्या बेसमेंटमध्ये एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी हाती डिझेलची कॅन घेऊन भाजप कार्यालयावर हल्लाबोल केला. तेथील बॅनर, पोस्टर फाडून टाकले. काही जाळले. पाण्याच्या जारची तोडफोड करण्यात आली. नामफलकावर शाई फेकण्यात आली. काहींनी दगडफेक केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. सुमारे अर्ध्या तासाच्या या तडक आंदोलनाची शिवसैनिकांकडूनच व्हिडीओ शूटिंग करण्यात आले. ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासह भाजपचे तुषार भारतीय व पदाधिकारी पोहोचले. तात्काळ क्यूआरटी पथकासह अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. राजकमल चौकात निदर्शनादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, डिगंबर मानकर, अर्चना धामणे, नितीन सायवान, गुरू गिंगमिरे, अतुल थोटांगे, विनोद सुनील डहाके खडसे, विकास शेळके, ललित झंझाड उपस्थित होते. 

राणेंचा ‘कोंबडीचोर’ म्हणून नामोल्लेखकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्यप्रकरणी शिवसेनेच्यावतीने शहर कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल अपशब्द हा जनतेचा अपमान आहे. नारायण राणे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे