शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘शिवाजी’चे शाळा,महाविद्यालय सौरऊर्जेने लखलखणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:18 PM

श्री शिवाजी शिक्षण संस्थेला दररोज ०.४ मेगावॅट विद्युत लागते. संस्थेचे अध्यक्ष हे माझे विधानसभेतील सहकारी राहिले आहेत. त्यांनीच सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव द्यावा, ५० टक्के अनुदान आजच जाहीर करतो, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२० व्या जयंत्युत्सवात दिली.

ठळक मुद्देभाऊसाहेबांचा जयंत्युत्सव : संस्थेचा प्रस्ताव पाठवा, ५० टक्के अनुदानाची ऊर्जामंत्र्यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेला दररोज ०.४ मेगावॅट विद्युत लागते. संस्थेचे अध्यक्ष हे माझे विधानसभेतील सहकारी राहिले आहेत. त्यांनीच सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव द्यावा, ५० टक्के अनुदान आजच जाहीर करतो, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२० व्या जयंत्युत्सवात दिली.संस्थेचा विद्युत कर माफ करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी भाषणादरम्यान केली. ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक भाष्य करणे योग्य नाही. मात्र संस्थेने आता सौरऊर्जा प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा. संस्थेला २५ वर्षे विद्युत बिल भरण्याची गरज पडणार नाही, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगताच उपस्थितांनी त्याला दाद दिली. भाऊसाहेबांच्या १२० व्या जयंत्युत्सवानिमित्त संस्थेचेच माजी विद्यार्थी ना. बावनकुळे विशेष आकर्षण होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेत संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अन् भाऊसाहेब यांच्या विचारांचा सार असल्याचे संस्थाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य शीतल यदुराज मेटकर व चमुने नरसी मेहता व राष्टवंदनेवर अप्रतिम ओडीसी नृत्य सादर केले. राजेश उमाळे यांनी स्वागत-गौरवगीत सादर केले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीवन सदस्य, पदाधिकारी, विद्यार्थी व अमरावतीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाऊसाहेबांना आतापर्यंत ‘भारतरत्न’ का नाही?भाऊसाहेबांचे कार्य मोठे आहे. शासनाला त्याची माहिती आहे. पण, आतापर्यंत भाऊसाहेबांना ‘भारतरत्न’ का जाहीर केले नाही, असा थेट सवाल श्रोत्यांमध्ये बसलेले सामाजिक कार्यकर्ते बबनराव गुडधे यांनी ऊर्जामंत्र्यांना भाषणाच्या सुरुवातीलाच केला. मंत्रिमहोदयांनी याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. भाऊसाहेबांना ‘भारतरत्न’ मिळायला हवे, ही सर्वांची हार्दिक इच्छा असल्याने उपस्थितांनी गुडधे यांचे समर्थन केले.अनंत पंजाबराव देशमुख प्रशासकीय अकादमीभाऊसाहेबांचे पुत्र अनंत देशमुख यांचे कार्य अनमोल आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी संस्थेने त्यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा अकादमीची स्थापना केली आहे. अकादमीतून प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक बाबींचे मार्गदर्शन केले जाईल. ग्रामीण युवकांसाठी ही मोठी उपलब्धी राहणार असल्याचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख याप्रसंगी म्हणाले. अनंत पंजाबराव देशमुख अकदमीचे उद्घाटन ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या कार्याचा मान्यवरांनी गौरव केला.