लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जंगलातील बिबट्याने वडाळीच्या एसआरपीएफ कॅम्प स्थित पोलीस निरीक्षकाच्या बंगल्यावरील लॅब्राडॉर श्वान रविवारी मध्यरात्री फस्त केले. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत वनविभाग या भागात पोहोचले नव्हते. वनविभागाच्या अनास्थेबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.जंगलालगत असणाऱ्या एसआरपीएफ कॅम्पमध्ये यापूर्वीही बिबट्यांचा संचार आढळून आला आहे. गेल्या वर्षात बिबट्याने धुमाकूळ घालत आठ ते दहा श्वान उचलून नेऊन फस्त केले होते. त्यावेळी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न केले. मात्र, तो वनविभागाच्या जाळ्यात अडकला नव्हता. त्यानंतर रविवारी बिबट्याने आपले अस्तित्व दाखविले. रात्रीच्या सुमारास राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ चे पोलीस निरीक्षक एम.बी. नेवारे हे त्यांच्याकडील मादी लॅब्राडॉर श्वानाला बंगल्याच्या आवारात सोडतात. रविवारी रात्री श्वानाला आवारात सोडून नेवारे कुटुंबीय घरात झोपले. यादरम्यान मध्यरात्री बिबट्याने बंगल्याच्या आवारात शिरून त्यांच्या श्वानाला उचलून नेले. श्वानाचे केकाटणे ऐकून त्यांनी बाहेर येऊन पाहिले; मात्र श्वान दिसले नाही. रात्रीच्या अंधारात श्वानाचा शोध घेणे धोक्याचे ठरू शकते, ही जाणीव झाल्याने त्यांनी सोमवारी सकाळी श्वानाचा शोध सुरू केला. त्यावेळी जंगलातील झाडाझुडुपात त्यांना श्वानाचा मृतदेह आढळला. श्वानाला बिबट्याने अर्धवट खाल्ल्याचे दिसले. त्यांनी या घटनेची लेखी तक्रार वडाळी वनविभागाकडे केली. या तक्रारीत त्यांनी वनविभागाकडे २० हजारांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.तक्रारीची दखल नाहीबिबट्याने बंगल्याच्या आवारात शिरून श्वान उचलून नेले. या घटनेची तक्रार केली जाते. मात्र, तक्रार होऊनही वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचत नाही. जंगल व वन्यप्राण्याच्या सुरक्षेची जबाबदारी असणाºया वनविभागाला माहिती मिळाल्यानंतरही ते घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे यावरून निदर्शनास येत आहे.
पीआयच्या बंगल्यावरील श्वान बिबट्याने केले फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 1:26 AM
जंगलातील बिबट्याने वडाळीच्या एसआरपीएफ कॅम्प स्थित पोलीस निरीक्षकाच्या बंगल्यावरील लॅब्राडॉर श्वान रविवारी मध्यरात्री फस्त केले. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत वनविभाग या भागात पोहोचले नव्हते. वनविभागाच्या अनास्थेबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देतक्रारीची दखल नाही