लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने बसविण्यासंदर्भात श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीची सभा महापालिकेच्या सभागृहात सोमवारी पार पडली. वास्तुविशारदांनी यावेळी पुतळ्यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर समितीने शिवटेकडी गाठून स्थळपाहणी केली.शिवटेकडीवर पुतळ्यासाठी आवश्यक चबुतऱ्याचे डिझाइन आर्किटेक्ट सुशील खंडारकर यांनी पुरविले. त्या अनुषंगाने महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी उपमहापौर संर्ध्या टिकले, सभागृहनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, अपक्ष गटनेता दिनेश बूब, माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, बसपा गटनेता चेतन पवार, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखापरीक्षक राम चव्हाण, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, शहर अभियंता रवींद्र पवार, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, अभियंता दिनेश हंबर्डे, आर्किटेक्ट सुशील खंडारकर, स्ट्रक्चरल डिझाइनर आदी उपस्थित होते. सदर कामाबाबत लवकरच बैठक आयोजित करावी, अशा सूचना संबंधितांना यावेळी देण्यात आल्या.
शिवटेकडीवर शिवरायांचा नवीन पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:27 PM
शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने बसविण्यासंदर्भात श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीची सभा महापालिकेच्या सभागृहात सोमवारी पार पडली. वास्तुविशारदांनी यावेळी पुतळ्यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर समितीने शिवटेकडी गाठून स्थळपाहणी केली.
ठळक मुद्देवास्तुविशारदांशी चर्चा : अश्वारूढ पुतळा समितीची सभा