चांदूर रेल्वे : ६ जून रोजी सकाळी ९ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यलयांत शिवराज्याभिषेक दिन साजरा करणेबाबत शासनाने पत्राद्वारे सुचविले आहे.
हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार राज्याभिषेक ६ जून रोजी दरवर्षी साजरा केला जातो. राज्यात शिवसेनेसह महाविकास आघाडीचे शासन आल्यापासून अनेक नव्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज हे आघाडीचे आद्यस्थान असल्याने त्यांचा प्रत्येक दिन हा विशेष करण्यावर शासनाचे लक्ष आहे. त्यानुसार ६ जून रविवारी राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार आहे.
- कसा करायचा साजरा
*भगवा स्वराज्य ध्वजसंहिता*
शिवकलश राजदंडावर भगवा स्वराज ध्वज बांधून घ्यावा
ध्वज हा उच्च प्रतीचे सेटीन असलेली भगवी जरी पताका असावी. ध्वज हा ३ फूट रुंद आणि ६ फूट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदीपेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा, अशा सूचना पत्रात दिल्या आहेत.
- *शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता*
शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणुन कमीतकमी १५ फुट उंचीचा बासा किवा बांबु असावा . त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी, राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला कमान ५ ते ६ फुटाचा आधार द्यावा.
- ६ जून सकाळी ९ वाजता शिवशक राजदंडवर भगवा स्वराजध्वज बांधून घ्यावा. शिवशक राजदंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा " सुवर्ण कलश " बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुडी हे अष्टगंधाने लिहुन त्यावर अक्षता लावाव्यात. पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. त्यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत म्हणून सांगता करावी.
-आवश्यक सामग्री
सुवर्ण कलश, पुष्पहार गाठी. आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद कुंकू, ध्वनिक्षेपक आदी साहित्याचा वापर करण्याचाही पत्राद्वारे निर्देश दिले आहे.