अमरावती : पश्चिम विदर्भात संघटनेकडे विशेष लक्ष न देणाऱ्या शिवसेनेने आता लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.पश्चिम विदर्भ शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून मानला जातो. मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाला भरभरून यश मिळवून दिले.यामध्ये शिवसेनेला अमरावती जिल्ह्यात एकही जागा कायम ठेवता आली नाही. त्यामुळे आता पश्चिम विदर्भातील शिवसेनेचा बाल्लेकिला कायम ठेवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चित्र बदलावे यासाठी शिवसैनिकांना नव्याने ऊर्जा देण्यासाठी सेना नेते आणि पक्षातीलप्रमुख पदाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. याचाच एक भाग म्हणून अमरावतीत शुक्रवारी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि रवींद्र मिर्लेकर यांनी जिल्ह्यातील सेना पदाधिकारी यांच्याशी संघटनात्मक आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतली. संघटन बांधणीचा कानमंत्र दिला आहे. शासकीय विश्रामगृहात या सेना नेत्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय बंड, प्रशांत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, सुधीर सूर्यवंशी व अन्य प्रमुख सेना पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुका स्वतंत्र लढविण्याच्या उद्देशाने स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करताना तरूणाईला फोकस केले जाणार आहे. विधानसभा निवडणूकीत पश्चिम विदर्भात शिवसेनेला अनअपेक्षित होते .यापुर्वी या भागात सर्व निवडणूकीत मतदारांनी उस्फूर्त साथ दिली आहे. त्यामुळे कुठे कमी पडलो पुढील वाटचाल कशी राहील कार्यकर्त्याचे मनोबल कशाप्रकारे उंचावेल यावर या चर्चेत भर देण्यात आला आहे. त्यामुळे आमागी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका साठीही ही संघटनात्मक चर्चा महत्वपूर्ण मानली जात असल्याचे सेनेच्या गोठात बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
पश्चिम विदर्भावर शिवसेनेचे लक्ष
By admin | Published: January 31, 2015 11:11 PM