एसटी महामंडळ; प्रवाशांचा ४० टक्के प्रतिसाद
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या बसची चाके आता बऱ्यापैकी रुळावर आली आहे. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास महामंडळाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विशेषतः शिवशाही बसला प्रवाशांकडून ४० टक्के प्रतिसाद मिळत आहे.
अनलॉकनंतर महामंडळाची गाडी बऱ्यापैकी रूळावर येत आहे. परिणामी उत्पन्न वाढीस हातभार लागत आहे. अर्थात सर्वच मार्गावरील बसना प्रतिसाद मिळत नसला तरी लांब व मध्यम पल्ल्याच्या शिवशाही बस सुसाट निघाल्याचे दिसते. टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या प्रवासी बसचा परिणाम दिसून येत आहे. ग्रामीण भागातील अनेक मार्गांवर बस सुरू झाल्यामुळे अधिक चालना मिळाली. बसकडे प्रवाशांचा कल वाढला असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. रक्षाबंधनापासून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता गणेशोत्सवासाठीदेखील बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे.
बॉक्स
या मार्गावर आहेत शिवशाही बस
अमरावती-यवतमाळ
अमरावती-नागपूर
अमरावती-दर्यापूर,
अमरावती-वरूड
वरूड-नागपूर
बॉक्स
दररोज सॅनिटायझेशन
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगारापासून निघालेल्या बस रोजच सॅनिटायझेशन केले जात असल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले. अमरावती निघणाऱ्या शिवशाही आणि अन्य ठिकाणाहून अमरावतीला येणाऱ्या शिवशाही बस सॅनिटाईझ केल्या जातात परिवहन महामंडळाकडून याबाबतचे आदेश प्रत्येक आगाराला देण्यात आले आहे.
बॉक्स
बहुतांश मार्गावर दिसतोय प्रतिसाद
शिवशाही बस ज्या मार्गावर धावत आहे. त्या मार्गावर प्रवाशांचा ४० टक्केच प्रतिसाद मिळत आहे. हा अपवाद सोडला, तर अन्य बसेसला समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. शिवशाहीला प्रतिसाद कमी दिसत असला तरी अन्य गाड्यांमध्ये प्रवाशांचा प्रतिसाद अधिक वाढला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून जादा बस सोडल्या जात आहेत.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण आगार - ८
सुरु असलेल्या शिवशाही बसेस - २५
एकूण शिवशाही ४५