कुलगुरु : अमरावतीची बाजी, विविध स्पर्धांतर्गत पारितोषिकांची लयलूटअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ.पंजाबराव देशमुख साहित्य कला आणि सांस्कृतिक अकादमीच्यावतीने सुरू केलेला शिवोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले असून या माध्यमातून तळागाळातील प्रतिभावंत समोर येतील, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मोहन खेडकर यांनी केले. शिवोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या महाविद्यालयीन गट उद्घाटन समारंभाप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव चर्जन प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारिणी सदस्य एम.के. नाना देशमुख, सचिव प्राचार्य वि.गो. भांबुरकर, स्वीकृत सदस्य प्राचार्य वि.गो. ठाकरे यांची उपस्थिती होती. शिवोत्सवच्या महाविद्यालयीन गट अंतिम फेरीत वादविवाद स्पर्धा, भारतीय समूहगान स्पर्धा पार पडली. वादविवाद स्पर्धेत शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीला सांघिक प्रथम क्रमांक प्राप्त झाले. द्वितीय क्रमांकाचे मानगरी आकोट येथील शिवाजी महाविद्यालय ठरले. वैयक्तिक गटात वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावतीच्या अनिरुद्ध महाजन या विद्यार्थ्याने, तर द्वितीय क्रमांक गौरव तिवसकर, तिवसा, तृतीय क्रमांक चिखली येथील नेहा शिंदे या विद्यार्थिनीने पटकाविला. समूहगान स्पर्धेत शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या चमुला प्रथम, जे.डी. पाटील महात्मा फुले कला व वाणिज्य महाविद्यालय, वरुडला, तर आर.आर. लाहोटी महाविद्यालयाच्या चमुने द्वितीय क्रमांक पटकाविला. महाविद्यालयीन गटाच्या अंतिम फेरीत अमरावती जिल्ह्याचेच वर्चस्व राहिले. कार्यक्रमाचा समारोप संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी सदस्य गजानन पुंडकर, सचिव प्राचार्य वि.गो. भांबुरकर, स्वीकृत सदस्य प्राचार्य वि.गो. ठाकरे, अरविंद मंगळे, प्राचार्य अरुण सांगोळे, एस. जामोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रास्ताविकातून डॉ.पंजाबराव देशमुख साहित्य कला आणि संस्कृती अकादमीचे सचिव किशोर फुले यांनी शिवोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाची भूमिका विशद केली. वादविवाद स्पर्धेचे परीक्षण सतीश देशमुख, डी.बी. देशमुख व हेमंत खडके यांनी कले. समूहगान स्पर्धेचे परीक्षण राहुल तायडे, राम नवसाळकर व नयना दापूरकर यांनी कले. समूहगान स्पर्धेचे परीक्षण राहुल तायडे, राम नवसाळकर व नयना दापूरकर यांनी केले. प्रास्ताविक व संचालन मीना रोकडे व आभार प्रदर्शन प्राचार्य वनिता काळे यांनी केले. (प्रतिनिधी)
शिवोत्सव सांस्कृतिक महोत्सव स्तुत्य उपक्रम
By admin | Published: December 28, 2015 12:21 AM