आॅनलाईन लोकमतअमरावती : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने प्रभू रघुनंदन श्रीराम जन्मोत्सव रविवारी शहरात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतील विविध देखावे आकर्षण ठरले. श्रीरामाच्या गजराने अंबानगरी दुमदुमून निघाली. यावेळी शोभायात्रेत विविध १५ झांकींनी सहभाग घेतला.ही शोभायात्रा रविवारी दुपारी ५ वाजता प.पु. संत सीतारामबाबा मंदिर प्रांगण बालाजी प्लॉट येथून काढण्यात आली. शहरात राजापेठ, राजकमल चौक, जयस्तंभ चौक ते अंबादेवी मंदिराजवळ त्याचा समारोप झाला. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. भगवे झेंडे विशेषत्वाने फडकविले गेले. यावेळी श्रीरामाचा जन्मोउत्सव मोेठ्या श्रेद्धेने साजरा करण्यात आला.यावेळी श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष नितीन धांडे, उपमहापौर संध्या टिकले, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकुमार जाजोदीया, जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी, चंद्रशेखर भोंदू, विशाल कुळकर्णी, जयंत कद्रे, किशोर बोरकर, प्रल्हाद ठाकरे, अजय साळसकर, प्रणित सोनी, सुरेखा लुंगारे, सुधा तिवारी, स्वागताध्यक्ष जॉनीभाई जयसिंघानी, कार्याध्यक्ष प्रवीण गिरी, उपाध्यक्ष नीलेश ठाकरे, चंद्रकांत पोपट, अनिल पमनानी, उमेश घोंगडे, सचिव जयेश राजा, बंटीजी पारवानी, सुधीर बोपुलवार, दिनेश सिंह, सुमित साहू, निरंजन दुबे, सिद्धू सोलंकी, चेतन वाटणकर, प्रतीक पाटील नीलेश मारोडकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी व भाविकांनी शोेभायात्रेत सहभाग घेतला. ठिकठिकाणी प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेची व पादुकांची पुजा अर्चना करण्यात आली.श्री दाशरथी राम मंदिरात रामनवमी उत्सवदर्यापूर : येथील श्री. दाशरथी राम संस्थानतर्फे रविवारी रामजन्मोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला. १२१ वर्षांपूर्वी बांधलेले जुना दर्यापुरातील राममंदिर अनेकांचे श्रद्धास्थान असून, या ठिकाणी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. दिवसभरात दहा हजारांवर भाविकांनी येथे दर्शन घेतले.या मंदिराला नारदीय कीर्तन परंपरा असून या ठिकाणी रामनवमीला दहा दिवस कीर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते. अशा परंपरेला १०१ वर्षे झाले आहे. यावर्षी मोहनबुवा कुबेर नागपूर यांनी नऊ दिवस कीर्तन केले. सोमवारी काल्याच्या प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. येथील प्राचीन मंदिराची स्थापना स्व. रामकृष्ण गणोरकर यांनी केली होती. सद्यस्थित दाशरथी श्रीराम मंदिर पंचकमीटीचे सचिव महेश गणोरकर कारभार पाहत आहेत. ट्रस्टी म्हणून दादासाहेब गणोरकर, रवि गणोरकर, धनंजय गणोरकर, शिरीष गणोरकर आदींचा समावेश आहे. येथे प्रसाद वाटप करण्यात आले होते. महिलांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
शोभायात्रेने दुमदुमली अंबानगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:27 PM
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने प्रभू रघुनंदन श्रीराम जन्मोत्सव रविवारी शहरात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली.
ठळक मुद्देश्रीराम नवमी : रामनामाचा गजर, विविध देखाव्यांचे सादरीकरण