शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 4:33 PM

यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला.

ठळक मुद्दे शंभर दिवसांत २९० शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षणाचा खर्च या विवंचनेत जगाचा पोशिंदा मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे व दरवर्षी कजार्चा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ९८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ७१८ प्रकरणे पात्र, ८ हजार ११९ अपात्र तर १५२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा २९० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, यामध्ये जानेवारी महिन्यात ९७ फेब्रुवारी ८२, मार्च ९२, तर १० एप्रिलपर्यंत १९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.महसूल विभागाच्या निरीक्षण नोंदीनुसार सर्वाधिक ४५ टक्के आत्महत्या ह्या ३० ते ४० या वयोगटातील तरूण शेतकऱ्यांच्या आहेत. यामध्येही सर्वाधिक प्रमाण अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांचे आहे. यात दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शासनाच्या उपाय तोकडे ठरत असल्याने शेतकरी आत्महत्यामुक्त होण्यासाठी वरवरची मलमपट्टी नव्हे, तर दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे.२००१ पासून १४,९८९ शेतकरी आत्महत्याविभागात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १४ हजार ९८९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये २०१७ मध्ये सर्वाधिक १,१७६, सन २०१६ मध्ये १,२३५,सन २०१५ मध्ये १,३४८, सन २०१४ मध्ये ९६४, सन २०१३ मध्ये ८०५, सन २०१२ मध्ये े९५१, सन २०११ मध्ये ९९९, सन २,०१० मध्ये १,१७७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.कर्जमाफीच्या ३१५ दिवसांत ९५२ आत्महत्याजून २०१७ मध्ये शासनाने कर्जमाफी जाहीर केली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच ३१५ दिवसांत ९५२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. किंबहुना या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये जून महिन्यात ८२, जुलै ८९, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२१, आॅक्टोबर ९६, नोव्हेंबर ८८, डिसेंबर ६५, जानेवारी २०१८ मध्ये, ९७, फेब्रुवारी ८२, मार्च ९२ व १० एप्रिलपर्यंत १९ शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या