शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

धक्कादायक; भूजलपातळीत १८ फुटांपर्यंत तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:09 PM

भूजल पुनर्भरण होण्याच्या काळात पावसात खंड राहिल्याने पाण्याच उपसा झाला. परिणामी जिल्ह्यातील पाण्याची पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा १८ फुटांपर्यंत घटली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९८ मीटरने भूजलात घट झाली.

ठळक मुद्देसर्वच तालुके माघारले : अचलपुरात सर्वाधिक सहा मीटर, चांदूरबाजार तालुक्यात ४.१७ मीटरने तूट

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भूजल पुनर्भरण होण्याच्या काळात पावसात खंड राहिल्याने पाण्याच उपसा झाला. परिणामी जिल्ह्यातील पाण्याची पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा १८ फुटांपर्यंत घटली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९८ मीटरने भूजलात घट झाली. सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी होत असल्याने भूजलात मोठ्या प्रमाणात तूट अपेक्षित आहे. मात्र, या तीन वर्षांत जवळपास १२ हजारांवर जलयुक्तची कामे झालीत. परिणामी भूजलातील घट काही प्रमाणात रोखली गेल्याचे वास्तवदेखील नाकारता येत नाही.पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याचे परिणाम जाणवायला लागले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वच तालुक्यातील १७० निरीक्षण विहिरींतील पाण्याच्या स्थिर पातळीचे जानेवारीअखेर केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, सर्वच तालुक्यांमध्ये भूजलात घट झाल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. भूजल पातळीमधील तूट दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील ८० गावांना मार्चपर्यंत, तर एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ११ तालुक्यांतील १२९ गावांत भीषण पाणीटंचाई राहणार राहण्याची शक्यता आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाचा व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुर्नभरणास योग्य आहे. यंदा सरासरी २६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. लघुपाणलोट क्षेत्रातील (रनआॅफ झोन) निरीक्षण विहिरींतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील आठ (१) च्या तरतुदीनुसार या गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक असल्याचा अहवाल यापूर्वीच भूजल विभागाने जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे.चिखलदरा, धारणी तालुक्यांतील गावे डोंगराळ भागात आहेत. येथे भूस्तर जलग्रहण क्षमता कमी असल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. वरूड व मोर्शी तालुक्याचा भाग अतिविकसित पाणलोट क्षेत्रात असल्याने व येथे बारमाही सिंचन जास्त प्रमाणात असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. भूजलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाला उपशावर निर्बंध आणावे लागणार असल्याचे वास्तव आहे.जलयुक्तचा परिणाम; गतवर्षीच्या तुलनेत ०.३७ ने तूटसन २०१७ मध्ये जिल्ह्यात ८१४.१९ मिमी पाऊस झालेला होता. त्याच्या तुलनेत सन २०१८ मध्ये ५४६.३० मिमी पाऊस झाला. म्हणजेच जिल्ह्यात २०१७ च्या तुलनेत २६८.१८ मिमी पाऊस कमी झालेला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जानेवारी २०१७ अखेर नोंदविलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यात सरासरी ८.५३ मीटरवर भूजल पातळी होती. त्याच्या तुलनेत यंदा जानेवारीअखेर ८.९ मीटरवर सरासरी भूजल पातळी आहे. यामध्ये केवळ ०.३७ मीटरचा फरक असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा भूजलात फारसी तूट झालेली नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत पाऊस अतिशय कमी झाला आहे. भूवैज्ञानिक उल्हास बंड यांच्या माहितीनुसार, जलयुक्तच्या कामांमुळे जिल्ह्यात पुनर्भरण होत आहे. त्यामुळे यंदा अधिक तूट नाही, तर पातळी स्थिर आहे.पाणलोट क्षेत्रात नव्या विहिरीस मनाईवरूड व मोर्शी हे तालुके अतिविकसित पाणलोट क्षेत्रात आहेत. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने, येथील भूजल उपशावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील ८(१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेला आहे.भूजलाचे पुनर्भरण होण्याच्या काळात पावसाचा प्रदीर्घ खंड राहिला व शेतीपिकांसाठी पाण्याचा उपसा झाल्याने भूजलपातळीत कमी आली. सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असतानाही जलयुक्तच्या कामांमुळे भूजलात गतवर्षीच्या तुलनेत स्थिरता आहे.-उल्हास बंडभूवैज्ञानिक, जीएसडीए