लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराच्या रेल्वेस्थानकावर दररोज ३ वाजून २५ मिनिटांनी येणारी अहमदाबाद एक्सप्रेस ८ फेब्रुवारी रोजी ४ तास उशिरा आल्याने ७:३० वाजता रेल्वे फलाटावर आली. धामणगाव रेल्वे स्थानकचे अधीक्षक कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार पुलगाव व तळणी रेल्वेमार्गाच्या मध्ये रेल्वे रुळाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दोन तासाचा ब्लॉक ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्वच गाड्या स्थानकावर उशिरा पोहचत होत्या.मंगेश भुजबळ, पवन शर्मा हे नातेवाईकांना घेण्याकरिता रेल्वे स्थानकावर गेले असता पवन शर्मा व इतरांना पॅन्ट्री कोचमध्ये प्रवाशांच्या भोजनासाठी वापरात येणारी बटाटे अक्षरश: पायांनी तुडवताना बघितले. सर्व पाहत असताना त्यांनी स्वत:च्या मोबाईल फोनवर व्हिडीओ घेऊन हा प्रकार कैद केला. सदर प्रकार प्रवाशांच्या जीविताशी व आरोग्यासाठी हानिकारक असल्याने त्या विषयाची तक्रार केली आहे. असा प्रकार पुढे होऊ नये याची काळजी घेणे ही रेल्वे प्रशासनाची जवाबदारी आहे. तशी तक्रार रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.