शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अचलपूरमध्ये कामगार नेत्यांचे 'शोलेस्टाईल' आंदोलन; फिनले मिल सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 12:57 PM

Amravati News दीड वर्षांपासून बंद असलेली फिनले मिल सुरू करण्याकरिता गिरणी कामगार संघाच्यावतीने अचलपूरमध्ये शोले स्टाईल आंदोलन सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देबॉयलरच्या तीनशे फूट उंच चिमणीवर चढले तीन पदाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : दीड वर्षांपासून बंद असलेली फिनले मिल सुरू करण्याकरिता गिरणी कामगार संघाच्यावतीने अचलपूरमध्ये शोले स्टाईल आंदोलन सुरू करण्यात आले. यात बॉयलरच्या ३०० फूट उंच चिमणीवर गिरणी कामगार संघाचे तीन पदाधिकारी २३ ऑगस्टला सकाळी साडेसहाच्या सुमारास चढले, जवळपास पाचशे कामगार मिलच्या गेटजवळ ठिय्या आंदोलन देत आहेत. ('Sholestyle' movement of labor leaders in Achalpur)

अध्यक्ष अभय माथने, उपाध्यक्ष राजेश ठाकूर व धर्मा राऊत हे सकाळी चिमणीवर चढले. अन्य दोघेही त्या चिमणीवर चढले. पण, चिमणी हलायला लागल्यामुळे ते दोघे खाली उतरले. पहाटे चिमणीवर चढलेले तीनही नेते मात्र सायंकाळपर्यंतही खाली उतरले नव्हते. ही माहिती मिळताच अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अब्दागिरे, परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर तसेच अचलपूर व परतवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फायर ब्रिगेडसह रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली. अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव व उपविभागीय अधिकारीदेखील फिनले मिलमध्ये पोहोचले. भाजपचे गजानन कोल्हे व अन्य पदाधिकारीसुद्धा घटनास्थळी दाखल झाले.

 

कामगार मागण्यांवर ठाम

बंद असलेली फिनले मिल सुरू करा. कामगारांना कामावर येऊ द्या. कामगारांच्या हातांना काम द्या, या मागणीसह वेतन आणि वेतनातील फरक मिळावा, याकरिता गिरणी कामगार संघाने हे आक्रमक पाऊल उचलले. धनंजय लव्हाळे, विवेक महल्ले, सचिन जिचकार, दिनेश उघडे, नरेंद्र बोरकर, मनीष लाडोळे, राजेश गौर, पिंट्या जायले, सुधीर भोगे या कामगारांनी दिला होता. वृत्त लिहिस्तोवर जनरल मॅनेजर अमित सिंग यांच्याशी मिल प्रशासनाच्यावतीने चर्चा सुरू होती.

-------------------

टॅग्स :agitationआंदोलन