अमरावती : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शनिवारी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ७४ जणांनी आरोग्य तपासणी करून घेतली. शिबिराला कॅफो चंद्रशेखर खंडारे, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांच्यासह पदाधिकारी व कमर्चारी उपस्थित होते. यावेळी डॉ. विनिता आसवाणी, सपना गुप्ता, दिनेश हिवराळे यांच्यासह आरोग्य चमूने आरोग्य तपासणी केली.
...............................................................
दस्तुरनगर वृद्धाश्रमात अन्नदान
अमरावती : गोंडबाबा मंदिरामागे दस्तुरनगर येथे सुख शांती वृद्धाश्रमात शनिवारी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हा शाखेतर्फे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दीक्षित, सचिव किशोर मालोकार, नितीन गायकी, महिला संघटक साधना पंचभाई आदींकडून अन्नदान करण्यात आले. यावेळी संचालक सुमन रेखाते, यश रेखाते, रचना दीक्षित, चंद्रकांत मामनकर, युवराज थोरात व पदाधिकारी उपस्थित होते.
........
ग्रामीण भागात पेटू लागल्या शेकोट्या
अमरावती : शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका मागील दोन दिवसांपासून अचानक वाढल्याने ग्रामीण भागात पहाटे आणि सायंकाळी रात्री उशिरापर्यंत शेकोट्या पेटू लागल्या आहेत. या शेकोट्यावर गप्पांचे फडही रंगत आहेत.
.........
नमुना परिसरात साफसफाईकडे दुर्लक्ष
अमरावती : महापालिकेला लागूनच असलेल्या नमुना परिसरात साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. तीन ते चार दिवस या भागातील नाल्या साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे समस्याचा रहिवाशांना सामना करावा लागतो. पालिकेचे स्वच्छता विभागाकडून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
............
नोंदणीसाठी डिसेंबरमध्ये मुद्रांक शुल्कात सवलत
अमरावती : शासनाने डिसेंबर २०२० पर्यंत दस्त नोंदणी केल्यास तीन टक्के मुद्रांक शुल्कात सवलत घोषित केली आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालये १२, १९ व २६ डिसेंबर या सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...........
बर्तन बाजार मंडळाचे रक्तदान शिबिर
अमरावती : रक्तदान समिती तहसील व बर्तन बाजार युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान समितीचे महेंद्र भुतडा, अजय दातेराव, हरीश पुरवार, मुकेश ओझा, अमन सोनी, मयूर पारेख, सीमेश श्रॉफ, मयूर पारेख, कुतुबुद्दीन हुसेन, मोहित तिवारी, डॉ. रूची सारडा, मनोहर ठोंबरे, तृप्ती गावंडे, अजय दहीकर, अमोल कुचे, सूरज नागपुरे आदींचे सहकार्य केले.
..........