फोटो पी ०६ उमरी
येवदा : दर्यापूर तालुक्यातील उमरी मंदिर येथील डीबीवर अर्थिंग न लावल्याने शॉर्टसर्कीट होऊन शंभर-सव्वाशे घरांतील उपकरणे नादुरुस्त झाली. यामध्ये अंदाजे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास ही घटना घडली.
ग्रामस्थांनी येथील वायरमनला घेराव घालून जाब विचारला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांना शांत केले. उमरी मंदिर येथील मुख्य डीबी दुरुस्त करण्यासंदर्भात येथील गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या तसेच तेथे कायमस्वरूपी वायरमनची नेमणूक करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली. दर्यापूर येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सी.एन. मोहोकार यांनी घटनास्थळी दाखल होऊन गावकऱ्यांच्या नुकसानाची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले.