अमरावती : भातकुली पोलिसांनी साई योगी गार्डनवर गुरुवारी धाड टाकून ४२९० रुपयांची अवैध दारू विक्री करताना जप्त केली. आरोपी बाळासाहेब विष्णुपंत तळोकार (५२, पटेलनगर, अमरावती), विशाल दिलीपराव विघ्ने (३०, देवरणकरनगर), रूपेश शेषराव थोरात (३६, लोणटेक) विरुद्ध गुन्हा नोंदवून समजपत्रावर सोडले.
-----------------------
राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा
अमरावती : बेरोजगार युवकांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने १२ व १३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा व इतर पात्रताधारक युवकांनी राज्य शासनाच्या वेबपोर्टलवर ऑनलाईन सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.