मोहन राऊत अमरावतीअंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार दुप्पट झाला आहे़ मात्र गावोगावी आरोग्य सांभाळणाऱ्या महिला आरोग्य परिचारिकांची आर्थिक स्थिती अद्यापही सुधारली नसून केवळ बाराशे रूपयांच्या मानधनात जिल्ह्यातील साडेतीनशे अंशकालीन आरोग्य परिचर तीस वर्षांपासून राबत आहे़जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात अंशकालीन आरोग्य परिचर काम करीत आहे़ त्यांना कोणत्याही सेवा सवलती मिळत नाही़ अर्धवेळ परिचर म्हणून कामाची नोंद होते़ मात्र दिवसभर चार ते पाच गावांच्या आरोग्य सेविकेसोबत राबराब राबावे लागते. जिल्ह्यातील महिला परिचारिकांच्या आर्थिक मोबदल्याच्या प्रश्नासाठी अनेक वर्षांपासून त्यांची संघटना आंदोलने करीत आहे़ तुटपुंज्या पगारावर राबणाऱ्या या अंशकालीन आरोग्य परिचरांना १० नोव्हेंबर २०१० रोजी शासनाने परिचारांच्या मानधनात ३०० रूपये वाढ करण्याचा अध्यादेश जारी केला. मात्र ही वाढ शासनाने एप्रिल २०१२ पासून दिली. तरी ही इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे वेतनही तोकडे पडत आहे़ आरोग्य परिचारांना शासनाकडून कोणत्याही प्रकाराचा प्रवासखर्च, महागाई भत्ता, पगारी रजा, सुट्टी, व इतर सेवा सवलती मिळत नाही़ अंशकालीन कर्मचारी म्हणून नोंद होते़ मात्र काम आठ तासांहून अधिक वेळ करावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया परिचरांनी दिल्या आहेत़ एकीकडे महिन्याला लाखोंच्या घरात पगार कमावणाऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण होतात. परंतु दुसरीकडे गावोगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चालक तर कधी मिळेल त्या वाहनाने आरोग्य परिचर म्हणून नोकरी करणाऱ्या या परिचरांना बाराशे रूपयांच्या पगारावर राबावे लागत आहे़ १९८४ पासून पंन्नास रूपये मानधनावर आरोग्य परिचर म्हणून काम करतात़ प्रसुतीचे पेश्ांन्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात आणणे लसीकरणासह इतर अनेक कामेही करावी लागते. मात्र त्यांचा मोबदला मिळत नाही़ शासनाने याचा गंभीर विचार करावा, असे मत जळगाव आर्वी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील महिला आरोग्य परिचारिका तुळसा खडसे या महिलेने व्यक्त केले़
अंशकालीन परिचारिका राबताहेत अल्प मानधनात
By admin | Published: November 20, 2015 1:10 AM