शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
3
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
4
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
5
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
6
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
7
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
8
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
9
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
10
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
11
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
12
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
13
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
14
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
15
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
16
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
17
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
18
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
19
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
20
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...

बीटीच्या ‘त्या’ वाणाचा यंदाही तुटवडा, विशिष्ठ वाणाच्या बियाण्यांची मागणी नकोच, कृषी विभागाचे आवाहन

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 22, 2024 9:38 PM

शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त आहे. जिल्ह्यात क्वचित ठिकाणी हंगामपूर्व कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे.

अमरावती : सर्व बियाण्यांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीटी कपाशीच्या विशिष्ठ वाणांच्या बियाण्यांचा आग्रह धरू नये, बियाणे विकत घेताना एमआरपीपेक्षा अधिक रक्कम देऊ नये, बियाणे खरेदीची पक्की पावती घ्यावी, शिवाय बियाणे उपलब्ध असताना विक्रेता देत नसल्यास जवळच्या कृषी कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त आहे. जिल्ह्यात क्वचित ठिकाणी हंगामपूर्व कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. मात्र लगतच्या जिल्ह्यातील काही परिसरात हंगामपूर्व लागवड होत असल्याने विशिष्ठ वाणाच्या बीटी बियाण्यांची मागणी वाढली आहे. या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून हे लोण जिल्ह्यात पसरण्याची शक्यता आहे. मागच्या हंगामातदेखील असाच प्रकार झाला होता. प्रत्यक्षात सर्व बीटी बियाण्यांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच असल्याचे कृषी उपसंचालक उज्ज्वल आगरकर यांनी सांगितले.

जमिनीत पुरेसा म्हणजेच ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. १६ मेपासून बियाणे जरी उपलब्ध होत असले तरी १ जूननंतरच कपाशीची लागवड करावी. पूर्वहंगामी कपाशी लागवडीने बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वाढून कपाशीचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. यंदा बियाण्यांचा तुटवडा नाही, कपाशीच्या सर्व वाणाचे पुरेसे बियाणे पाकिटे उपलब्ध असल्याची माहिती आगरकर यांनी दिली.------------------------‘त्या’ वाणाच्या बियाण्यांचा यंदाही तुटवडाशेतकऱ्यांद्वारा विशिष्ट वाणाच्या बीटी बियाण्यांची मागणी केली जाते. कृषी विभागाने या वाणाच्या अडीच लाख पाकिटांची मागणी कंपनीकडे नोंदविली होती. प्रत्यक्षात २५ हजार पाकिटेच उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने कळविले आहे. त्यामुळे हा तुटवडा भरून काढण्याचे आव्हान कृषी विभागासमोर उभे ठाकले आहे. १ जूननंतर पाऊस पडल्यानंतर बियाणे बाजारात गर्दी वाढणार आहे------------------------...तर विक्रेत्याचा परवाना होणार रद्दशेतकऱ्यांनी मागणी केलेले बियाणे उपलब्ध व साठा असताना जर विक्रेता देत नसेल तर त्यावर कारवाई होणार आहे शिवाय एमएसपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्या असेल, पक्की पावती देत नसेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यास चौकशीअंती कारवाई करून संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.-----------------------कपाशी बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. सर्व वाणांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच आहे. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवडीची गडबड करू नये. बियाणे असताना विक्रेता देत नसल्यास किंवा एमआरपीपेक्षा जास्त दर आकारल्यास तक्रार करावी.उज्ज्वल आगरकरकृषी उपसंचालक

टॅग्स :Farmerशेतकरी