लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : स्थानिक शिवाजी चौकात बिछायतीचा व्यवसाय करणाºया इसमाच्या घरी रविवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात घरातील साहित्यासह मंडप बिछायत जळून खाक झाले. या अग्निकांडात अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी अचानक विजेचा वायर जळाला यामुळे मोठे शॉर्टसर्किट झाले. यावर नियंत्रण मिळविण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केले. यात पाहता पाहता घरातील साहित्य, फ्रीज, आलमारी, कपडे व बिछायतीचे साहित्य काही क्षणातच जळून खाक झाले. आसपासच्या लोकांनी आपल्या घरातील पाणी व पाण्याच्या मोटारी लावून आगीवर नियंत्रण मिळविले.सुरजुसे यांचे घर तिवसा शहराच्या मध्यभागी असून वेळीच आग नियंत्रणात आणल्याणे पुढील अनर्थ टळला मात्र यात सुरजुसे यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या अचानक लागलेल्या आगीने सुरजुसे परिवार मात्र उघड्यावर आला आहे. यात मोठी वित्तहानी झाली. दुपारची वेळ असल्याने सुदैवाने सर्व बचावले. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी जाऊन चौकशी केली आहे.
शॉर्टसर्किटने घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 10:07 PM
स्थानिक शिवाजी चौकात बिछायतीचा व्यवसाय करणाºया इसमाच्या घरी रविवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात घरातील साहित्यासह मंडप बिछायत जळून खाक झाले.
ठळक मुद्देकुटुंब उघड्यावर : अडीच लाखांचे नुकसान, बिछायतीचे साहित्य खाक