लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात डेंग्यू डोके वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त प्रशांत रोडे यांनी गुरुवारी सर्व स्वच्छता कंत्राटदारांची बैठक घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले, तर स्वच्छता कंत्राटदारांना खडे बोल सुनावले. प्रभागातून नागरिकांची तक्रार आल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.स्वच्छ सर्वेक्षणाच्या नियमावलीप्रमाणे सर्वांनी काम करावे. शहरात कुठेही गटार साचलेले राहू नये, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी तुंबलेल्या गटाराचे जीओ टॅग फोटो संबंधित कंत्राटदारांना पाठवावे. शहरातील प्लास्टिक उचलून घ्यावे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करावीत. दर गुरुवार व शुक्रवारी फॉगिंग करण्यात यावे. प्रभागातून तक्रारी आल्यास संबंधित कंत्राटदाराला दंड करण्यात येईल, असे आयुक्तांनी सुनावले.महानगरपालिका व कंत्राटदार यामध्ये जो करारनामा झाला आहे, त्याप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे. कामगाराच्या खात्यात पैसे जमा केल्याचा पुरावा यापुढे बंधनकारक राहणार आहे. दरमहा बिल टाकणे अनिवार्य राहील. डेंग्यूचे रुग्ण ज्या प्रभागात निघत आहे, त्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कंत्राटदाराकडे असणारी यंत्रसामग्री प्रशासनाकडून येणाऱ्या काळात तपासण्यात येईल.ओला, सुका कचरा वेगवेगळा जमा कराज्या प्रभागात ओला-सुका कचरा वेगवेगळा करण्यात येत असेल, त्या प्रभागातील कंत्राटदाराचा सत्कार करावा आणि जे करीत नसतील, त्यांना दंड करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. प्रत्येक प्रभागात रूटमॅप लावण्यात यावा तसेच स्वच्छ सर्वेक्षणाबाबत आवश्यक कार्यवाही करावी. कचरा इतरत्र टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित असल्याचे आयुक्त म्हणाले.जीपीएस चालू करणे बंधनकारकमुख्य रस्त्यावर कचरा दिसल्यास संबंधितांना तात्काळ विचारणा करुन कार्यवाही करण्यात येईल. जी.पी.एस. चालू करणे बंधनकारक आहे. शहरातील बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त असल्यास त्याला दंड करण्यात यावा. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून, शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निघत आहे. त्याचे संपूर्ण नियोजन करून शहरात कुठेही कचरा दिसणार नाही, याची दक्षता घेण्याची तंबी आयुक्तांनी दिली.
डेंग्यू रुग्णांची नोंद झाल्यास कंत्राटदाराला ‘शो-कॉज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 5:00 AM
स्वच्छ सर्वेक्षणाच्या नियमावलीप्रमाणे सर्वांनी काम करावे. शहरात कुठेही गटार साचलेले राहू नये, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी तुंबलेल्या गटाराचे जीओ टॅग फोटो संबंधित कंत्राटदारांना पाठवावे. शहरातील प्लास्टिक उचलून घ्यावे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करावीत. दर गुरुवार व शुक्रवारी फॉगिंग करण्यात यावे. प्रभागातून तक्रारी आल्यास संबंधित कंत्राटदाराला दंड करण्यात येईल, असे आयुक्तांनी सुनावले.
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांचा इशारा : स्वच्छता विभागाची झाडाझडती