शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना मिळणार कारणे दाखवा नोटीस

By admin | Published: April 17, 2015 12:27 AM

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विविध विषयाला अनुसरून गुरूवारी जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख

जिल्हा परिषद : स्थायी समिती सभेत पिठासीन सभापतींच्या सूचनाअमरावती : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विविध विषयाला अनुसरून गुरूवारी जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत आरोग्य, शिक्षण बांधकाम व समाजकल्याण विभागाच्या प्रश्नांवर घमासान झाले. सभेला अध्यक्षांची परवानगी न घेता गैरहजर खातेप्रमुखांवर काय कारवाई करता, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे यांनी उपस्थित केला. यावर अशा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना पिठासीन सभापती सतीश ऊईके यांनी सभेचे सचिव के.एम अहमद यांना दिल्या आहेत. यावेळी सभेत जिल्हा परिषद सदस्यांना सभेचे कार्यवृत्त देताना ठरावाच्या प्रती देण्यात येत नाहीत. यावरून प्रशासनाला स्थायी समिती सदस्यांनी धारेवर धरत जाब विचारला. अखेर प्रशासनाने यावर माघार घेत सदस्यांचा प्रश्न बरोबर आहे. यामध्ये प्रशासनाकडून अनावधानाने चूक झाली. मात्र यापुढील सभेला सभेच्या कार्यवृताच्या प्रति उपलब्ध करून देण्याचे सचिव के.एम अहमद यांनी मान्य केले. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करताना सदस्यांना विश्र्वासात घेतले जात नाही. परिणामी रिक्त जागी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे राहतात. त्यामुळे रिक्त पदे भरली जात नाहीत. यामध्ये अनियमितता होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सुधीर सूर्यवंशी, चित्रा डहाणे, अभिजित ढेपे, प्रताप अभ्यंकर आदी यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्तर विचारले. मात्र यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर याबाबत पुढील सभेत विस्तृत माहिती देण्याचे चऱ्हाटे यांनी सभागृहात सांगितले. यासोबतच तिवसा पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम मागील ३ वर्षांपासून पूर्ण झाले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावाईस अशी मागणी सुधीर सूर्यवंशी यांनी सभागृहात केली आहे. दरम्यान यासंदर्भात योग्य चौकशी करण्याचे बांधकाम सभापती गिरीश कराळे यांनी सभागृहात सांगितले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, सदस्य प्रताप अभ्यंकर, सुधिर सूर्यवंशी, अभिजित ढेपे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी के.एम अहमद, व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)अनियमित कामांची होणार चौकशीअंजनगाव सुर्जी पंचायत समिती मध्ये दलित वस्ती विकास निधीअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कृती आराखडा तयार करून पं.स. कडे पाठविला जातो. परंतु पंचायत समितीस्तरावरून ग्रा.प.ने सुचविलेली कामे न घेता स्वत: नियमबाह्य कामे जिल्हा परिषद स्तरावर पाठविले या प्रकरणी विस्तार अधिकारी पवार आणि ढवळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात येवू नये असा प्रश्न स्थायी समिती सभेत उपस्थित करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची सूचना अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी केली. या चौकशी समितीत उपमुख्यकार्यकारी अधिकारी के.एम. अहमक, समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांचा समावेश आहे. दलित वस्तीच्या कामांची देयके बीडीओ भाष्कर रेंगळे यांनी अदा केली नाहीत. त्यामुळे त्यावरही प्रश्नांची सरबत्ती सभागृहात करण्यात आली.वर्ग जोडले पुढे काय?जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ५ ते ८ याप्रमाणे आरटीई कायद्यानुसार जोडण्यात आले. मात्र इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अद्यापही शिक्षण विभागाने तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, वर्ग जोडले मात्र पुढच्या शिक्षणाचे काय दरम्यान यासंदर्भात सभागृहात ५ ते ८ वी असे वर्ग जोडले परंतु आठवीच्या विद्यार्थ्याना शिक्षणासाठी पुरेसे साहित्य, तज्ञ शिक्षक, लेबॉरर्टी, गणित शिक्षक नाही? सध्याही डी.एड. शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. सदस्यांच्या या गंभीर प्रश्नांवर अध्यक्षांनी दखल घेऊन शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना उत्तर देण्याचे सांगितले. यावेळी सदस्यांचे म्हणणे बरोबर असल्याने याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे आश्र्वासन सभागृहात शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.