लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या शालेय विज्ञान प्रदर्शनींचा धडाका येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान तालुका ते राज्यस्तरावर विविध विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहेत.प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्यावतीने ही प्रदर्शने भरविली जाणार आहेत. यंदा राज्यस्तरावर होणारे प्रदर्शन हे ४३ वे असून शाश्वत विकासासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम या विषयावर आधारलेले आहे. या मुख्य विषयांसह आरोग्य आणि सुदृढता, संसाधन व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक व दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान आणि गणितीय प्रतिकृती या उपविषयांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांना सादर करावयाचे आहेत. तालुका ते राज्यस्तरावरील प्रदर्शनींमध्ये ६ ते ८ आणि ९ ते १२ या वर्गातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या विज्ञान प्रदर्शनीत सर्व प्रकारच्या शासकीय आणि खासगी शाळांचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. एका वैज्ञानिक प्रकल्पासह एकच विद्यार्थी या प्रदर्शनीमध्ये सहभागी होऊ शकेल, यासाठी निवड प्रक्रिया विद्या प्राधिकरणने निश्चित केली असून त्याआधारे प्रदर्शनीत सहभागी शेकडो शिक्षक आणि विद्यार्थ्यंची निवड करावयाची आहे.शिक्षक, कर्मचाºयांच्याही स्पर्धाविद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक आणि प्रयोगशाळा कर्मचाºयांचेही विज्ञान प्रदर्शनी व स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य, निर्मिती तसेच प्रयोगशाळा सहायक आणि परिचरांसाठी प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय तालुका आणि जिल्हास्तरावर लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनीचे आयोजन करावयाचे आहे.
नोव्हेंबरपासून विज्ञान प्रदर्शनींचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 9:48 PM
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या शालेय विज्ञान प्रदर्शनींचा धडाका येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
ठळक मुद्देउपक्रम : प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे नियोजन