१६ -१७ वर्षांपासून श्री रामनवमी शोभायात्रा समितीद्वारे मोशी शहरांमध्ये रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जाते. रामनवमी शोभायात्रा हा उत्सव मोर्शीवासीयांकरिता एक पर्वणी असते. वर्षभर या उत्सवाची व शोभायात्रेची मोर्शीकर जनता आतुरतेने वाट बघत असते. शोभायात्रेचे स्वरूप इतके रम्य व भव्य असते मोर्शी शहराच्या आसपासच्या दहा-पंधरा किलोमीटर परिसरातील गावातील लोकही शोभायात्रेमध्ये उत्साहाने सामील होतात. परंतु मागील वर्षीपासून कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी ही शोभायात्रा रद्द करण्यात आली असल्याने श्रीराम भक्तांच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून श्री रामनवमी शोभायात्रा समिती द्वारा यंदाच्या रामनवमीला श्रीरामाचे पूजन हे आपापल्या घरी किंवा परिसरातच अत्यंत साधेपणाने व सर्व नियमांचे काटेकोर पालन करून करावे, असे आवाहन करण्यात आले होते.
श्रीरामनवमी शोभायात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:13 AM