शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

बॉम्बस्फोटातील आरोपींवर ‘एसआयडी’ची नजर, अमरावती, नागपूर कारागृहात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 7:46 PM

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम मुंबईत पुन्हा १९९३ सारखे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे कटकारस्थान रचत असल्याचे उघडकीस आले आहे.

अमरावती: कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम मुंबईत पुन्हा १९९३ सारखे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे कटकारस्थान रचत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या गृहविभागाने मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त बॉम्बस्फोटातील आरोपींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्य गुप्त वार्ता विभागाला (एसआयडी) दिल्याची माहिती आहे.मुंबईत १९९३ मध्ये दाऊद इब्राहिम याने बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. या बॉम्बस्फोटातील काही आरोपी नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. तर ११ जुलै २००६ मध्ये मुंबईत रेल्वे गाड्यांमध्ये तर १३ फेब्रुवारी २०१० रोजी पुणे येथील बेकरीत बॉम्बस्फोटाची मालिका घडवून आणल्याप्रकरणीचे आरोपी अमरावती मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.यापैकी काही जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. मात्र, नुकतेच दाऊद इब्राहिम याने मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे त्याच्या हस्तकांचे सांकेतिक भाषेत झालेले संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे गृह विभागाने मुंबई बॉम्बस्फोेटाशी निगडीतांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एसआयडीवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार बॉम्बस्फोटातील आरोपींना आतापर्यत कोणी भेटी दिल्यात, याबाबतची माहिती जुळविली जात आहे. कारागृहात आॅनलाईन भेटीदरम्यान आरोपींसोबतची नाती, रहिवासी पत्ता, आधारक्रमांक, ओळखपत्र आदी कागदपत्रांची पडताळणी एसआयडीचे अधिकारी करतील, अशी माहिती आहे. दहशतवादी अबू सालेम याचा साथीदार असलेला अब्दूल हसन मेंहदी हा खुनाच्या आरोपात अमरावती कारागृहात ३१ जानेवारी २००३ पासून जेरबंद आहे. त्यामुळे विदर्भातील नागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृहांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना गृहविभागाच्या आहेत.आरोपींना अंडा सेलमध्ये ठेवण्याचे निर्देशनागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींना अंडा सेलमध्ये ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यांच्या एकुणच हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एसआयडीवर जबाबदारी सोपविल्याची माहिती आहे. बॉम्बस्फोटातील आरोपींची यादी शासनाने मागविली आहे. त्यानुसार कारागृह प्रशासन अलर्ट झाले असून सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे अमरावती मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाºयाने सांगितले.कोट‘‘ अमरावती कारागृहात १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी नाहीत. परंतु अन्य बॉम्बस्फोटातील आरोपी बंदिस्त असून त्यांचेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या आरोपींना अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.रमेश कांबळेअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.