वरूड तालुका पोरका : तहसीलदारपद फक्त शोभेच बाहुले
प्रशांत काळबेंडे- जरूड : सद्यस्थितीत तालुक्यात कोरोना संसर्गाची स्थिती मंदावलेली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्याच्या विकएन्डला अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी व कडक निर्बंध लावले असताना जनतेला, महसूल व नगरपालिका प्रशासनाला या आदेशाचा विसर पडला आहे. शनिवार, रविवार बंदचे आदेश असताना सर्वच सुरू राहिल्याने तहसीलदार व मुख्याधिकारी यांचा बेजबाबदारपणा तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारे ठरत आहे.
करोना परिस्थिती आटोक्यात येत असताना काही शिथिलतेसह व निर्बंध जिल्हात तिसऱ्या लाटेचा शिरकाव होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तत्पर असताना त्याच्या अधिपत्याखालील कर्मचारी आणि अधिकारी त्यांचेच आदेशाला खो देत विकएन्डच्या कोणत्याही निर्बंधाची दखल घेत नसल्याने नागरिक सैराट झाले आहेत.
जिल्ह्यात विकएन्डला फक्त अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद असताना प्रभारी तहसीलदार घोडेस्वार यांना या आदेशाची कल्पनाच नसणे ही बाब जनतेला गोंधळात टाकणारी आहे. त्याचप्रमाणे सर्व काही पोलीस आणि आरोग्य विभागाने करावे, अशा आविर्भावात असलेल्या नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी वरूड शहर वाऱ्यावर सोडले आहे.
कोट
जिल्हाधिकारी यांनी काय सुधारित आदेश काढले याचा अभ्यास केल्यावर निस्छित कारवाई करेन. माझ्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना पाठवून परिस्थितीचे अवलोकन करण्यास सांगितले आहे.
- घोडेस्वार, प्रभारी तहसीलदार, वरूड