लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत आठवड्यात झालेल्या वादळी, वाऱ्यासह दमदार पावसाने तिवसा मतदारसंघातील बहुतांश गावांतील वीज गूल झाली. काळोखाने ग्रामस्थ हैराण तरीही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. परिणामी आ. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी महावितरण कार्यालयात धडक देत दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा अधीक्षक अभियंत्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला.तिवसा, गुरुदेवनगर, मोझरी, यावली शहीद, मोर्शी तालुक्यातील शिरजगाव, तिवसा तालुक्यातील वºहा, शेंदूरजना बाजार, शिरजगाव, मोझरी, तळेगाव ठाकूर, भारवाडी-पाणीपुरवठा केंद्र आदी गावांतील वीजपुरवठा वादळी पावसामुळे तब्बल पाच दिवस खंडित होता.यावेळी आ. यशोमती ठाकूर यांनी खंडित वीजपुरवठा, शिरजगाव येथील ४० पडलेले खांब, यावली केंद्राच्या गलथान कारभार, तिवसा येथे नवीन ट्रान्सफार्मर बसविणे, पावसाळ्यापूर्वी महावितरणने समस्यांबाबत नियोजनचा अभाव आदी बाबींमुळे ही परिस्थिती उद्भवल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधी, शेतकरी, गावकरी आदींनी विजेची समस्या मांडली. महावितरणचे अधीक्षक अभियंता सुहास मेहत्रे, कार्यकारी अभियंता ढोके, उपकार्यकरी अभियंता श्रीराव, तिवस्याचे उपकार्यकारी अभियंता तायडे यांना भ्रमणध्वनीवर माहिती देताना याविषयी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्यात. दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.यावेळी जि.प. सदस्य अलका देशमुख, तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, पं.स. सदस्य प्रशांत भुयार, पंकज देशमुख, सरपंच बबलू मक्रमपुरे, माजी सरपंच प्रशांत टाकरखेडे, वीरेंद्र जाधव, मुकद्दर पठाण, सरपंच अलका दामले, माजी सभापती दिलीप काळबांडे, अतुल यावलीकर, विशाल पवार, मुराद भाई, अंकुश बनसोड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:32 PM
गत आठवड्यात झालेल्या वादळी, वाऱ्यासह दमदार पावसाने तिवसा मतदारसंघातील बहुतांश गावांतील वीज गूल झाली. काळोखाने ग्रामस्थ हैराण तरीही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. परिणामी आ. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी महावितरण कार्यालयात धडक देत दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा अधीक्षक अभियंत्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला.
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : तिवसा मतदारसंघातील विजेची समस्या