शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

तूर खरेदीच्या मापात पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:12 PM

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या १२ तूर खरेदी केंद्रांवरील नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. येथे सॅम्पलच्या नावाखाली ग्रेडरद्वारा चक्क किलोभर तूर काढण्याचा प्रकार होत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. बारदाना वजनाच्या नावाखाली हा प्रकार करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील ग्रेडरची शेतकऱ्यांनी सामूहिक तक्रार केल्याने शासकीय खरेदीच्या मापातील पाप उघड झाले आहे.तूर खरेदीच्या ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लूट : सॅम्पलच्या नावावर काढतात किलोभर तुरी

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या १२ तूर खरेदी केंद्रांवरील नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. येथे सॅम्पलच्या नावाखाली ग्रेडरद्वारा चक्क किलोभर तूर काढण्याचा प्रकार होत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. बारदाना वजनाच्या नावाखाली हा प्रकार करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील ग्रेडरची शेतकऱ्यांनी सामूहिक तक्रार केल्याने शासकीय खरेदीच्या मापातील पाप उघड झाले आहे.तूर खरेदीच्या शासकीय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी नवनवीन फंडे वापरले जात असल्याचा प्रकार आता उघडकीस येत आहे. यंदा जिल्ह्यात डीएमओची नऊ, तर व्हीसीएमएफची तीन अशा बारा केंद्रांद्वारा खरेदी सुरू आहे. ५० किलोच्या काट्यामागे बारदानाच्या नावावर वेगवेगळ्या केंद्रावर ५०० ते ७०० ग्रॅमपर्यंत तूर जास्त घेतली जाते किंवा वजनात कपात केली जाते. वास्तविक, ५० किलोच्या कट्ट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बारदान्याचे वजन ३०० ते ४०० ग्रॅम असते.तूर खरेदीसाठी अगोदर चाळणी व आता आर्द्रतेचे निकष लावले जात आहेत, शिवाय सॅम्पलच्या नावावर वेगवेगळ्या केंद्रावर गे्रडरद्वारा किमान किलोभर तूर काढली जात आहे. या शेतकऱ्यांना उघडउघड लुटण्याच्या प्रकाराबाबत मस्तवाल अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने नवनवे फंडे पुढे येत आहेत. यासंदर्भात जिल्हा विपणन अधिकारी यांच्या संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही.ग्रेडिंगमध्येही भरडला जातोय शेतकरीशासकीय खरेदी केंद्रावर ग्रेडिंगचे काम करणाऱ्या एका कंपनीच्या ग्रेडरद्वारा खरेदी केलेली तूर मोजमापानंतर गोदामात ठेवण्यासाठी आणल्यानंतर गोदामावरील अन्य कंपनीच्या ग्रेडरद्वारा अडविली जाते व येथेही पुन्हा सॅम्पलच्या नावावर किलोपेक्षा जास्त तूर काढली जाते व कधीकधी रिजेक्ट केली जाते. विशेष म्हणजे, गोदामावर नाकारलेल्या तुरीचे पेमेंट रोखल्या जाते. या यंत्रणामध्ये समन्वय व सुसंवाद नसल्यामुळे शेतकरी नाहक भरडला जात आहे.उत्पादकतेच्या २५ टक्केच खरेदीनाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा (एमएससीएमएफ) तूर खरेदीचा करारनामा झाला. त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई स्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेत. यामुळे नाफेडद्वारा आधारभूत किमतीने तूर खरेदी होत असली तरी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे खरेदीची प्रक्रिया मंदगतीने राबविण्यात येत आहे.४३ हजार नोंदणी, १४ हजार शेतकऱ्यांची खरेदीजिल्ह्यातील १२ केंद्रावर सद्यस्थितीत ४३ हजार १८१ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असली तरी खरेदी मात्र १४ हजार ५३३ शेतकऱ्यांकडून झालेली आहे. हेक्टरी सरासरी उत्पादकता १२ क्विंटल ग्राह्य धरण्यात आलेली आहे. जिल्ह्यात यंदा १२ लाख क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उत्पादकतेच्या २५ टक्के म्हणजेच चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा शासनाचा डाव असल्यामुळे केंद्रांवरील खरेदीची गती मंदावली आहे.