शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
4
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
5
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
6
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
7
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
8
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
9
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
10
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
11
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
12
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
13
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
14
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
15
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
16
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
17
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
18
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
19
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
20
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका

११ कोटी थकीत असल्याने आजपासून कंत्राटदारांनी केले साफसफाई काम बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 1:11 PM

Amravati : कंत्राटदारांनी उपसले आंदोलनाचे हत्यार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महापालिका प्रशासनाकडे साफसफाईची सात महिन्यांची तब्बल ११ कोटी रुपयांची देयके थकीत असल्याने पाचही झोनच्या कंत्राटदारांनी १ ऑक्टोबरपासून साफसफाई काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे अवगत करण्यात आले आहे.

अमरावती महानगरातील पाचही झोनच्या साफसफाई कंत्राटदारांनी देयके अदा करा, अन्यथा १ ऑक्टोबरपासून साफसफाई काम बंद आंदोलन केले जाईल, असे निवेदनाद्वारे कळविले होते. मात्र, गत १५ दिवसांपासून प्रशासनाकडून देयकांसाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. कंत्राटी साफसफाई कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असल्यामुळे २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता आठवड्यावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. 

महानगरपालिकेला ८ कोटी ४२ लाखांचे अनुदान प्राप्त अमरावती महानगरपालिकेला राज्य शासनाकडून पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाकडून ८ कोटी ४२ लाख १६ हजार २१४ एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. असे असताना प्रशासन मात्र 'तारीख पे तारीख असा प्रयोग करीत असल्याचा आक्षेप साफसफाई कंत्राटदारांचा आहे. हे अनुदान पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरता येईल, असा ४ सप्टेंबर २०२४ रोजीचा शासनादेश आहे. मात्र, साफसफाई कंत्राटदारांना सलाइनवर ठेवण्यात येत आहे. साफसफाई कंत्राटदारांना गत सात महिन्यांपासून छदामही दिला नाही, अशी माहिती आहे. 

"थकीत देयके मिळावीत, यासाठी साफसफाई कंत्राटदारांचे निवेदन प्राप्त झाले आहे. यातून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रथल सुरू आहे. निधीची जुळवाजुळव केली जात आहे." - सचिन कलंत्रे, आयुक्त, अमरावती महानगरपालिका

टॅग्स :Amravatiअमरावती